NEW RATION CARD : नवीन रेशन कार्ड रेशन कार्ड सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे झालेले आहे. शासकीय कामांमध्ये लागणारे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे . हे रेशन कार्ड शासकीय प्रत्येक कामात तुम्हाला विचारले तसेच या रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये धान्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबात रेशन कार्ड असणे हे खूप आवश्यक झालेले आहे. यामुळे ज्या कुटुंबाकडे आपले रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांसाठी ही माहिती दिलेली आहे. या माहितीमध्ये नवीन रेशन कार्ड कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती , रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस काय आहे याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे.
नवीन रेशन कार्ड कोणाला काढता येणार
या शिधापत्रिका धारकांना 1 नोव्हेंबर पासून रेशन मिळणे बंद होणार, काय आहे त्याची कारण जाणून घ्या.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आम्ही तुम्हाला रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस दिलेली आहे.
ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड नाही किंवा कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे रेशन कार्ड मध्ये नाव नाही अशा कुटुंबाला नवीन रेशन कार्ड काढता येते. रेशन कार्ड हे प्रत्येकाकडे असणे हे अवश्य झालेले आहे. एखाद्या व्यक्तीकडे कुटुंबाचे रेशन कार्ड नसेल आणि त्या व्यक्तीला खूप सारे प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनला नवीन रेशन कार्ड काढता येते.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड काढायचे आहे त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे आधार कार्ड त्याबरोबरच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
- कुटुंबातील ज्या व्यक्तींचे मतदार यादी मध्ये नाव असतील त्या व्यक्तींचे मतदार ओळखपत्र आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
- 7/12 किंवा 8 अ.
- जर कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असेल तर प्रमाणपत्राची झेरॉक्स देणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील सर्व व्यक्तींचे पासपोर्ट 2 आकाराचे फोटो.
- रेशन दुकानदाराचे नवीन रेशन कार्ड साठी प्रमाणपत्र
- कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे बँक पासबुक झेरॉक्स
- घरपट्टी नाळपट्टी आणि ग्रामपंचायत.
रेशन कार्ड काढण्यासाठी ऑफलाइन पद्धत
रेशन कार्ड काढण्यासाठी तुमचे नाव कुठल्याही दुसऱ्या रेशन कार्ड मध्ये नसावे. जर नाव असेल तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढता येणार नाही. जर कोणत्याच रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढू शकतात. त्यासाठी तुम्हाला वरील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करून घ्यावी आणि फॉर्म पूर्ण घ्यावा व गावातील रेशन दुकानदाराचे प्रमाणपत्र जोडून तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात अन्नपुरवठा विभागात अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज दाखल केल्यानंतर तुमची नवीन रेशन कार्ड तयार होईल.
रेशन कार्ड फॉर्म PDF
वरील दिलेली माहिती ही ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढण्यासाठी आहे.
आता आपण घरी बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये ॲपच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड काढू शकतात याबद्दल माहिती पाहूया.
स्वतःच्या मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस
सध्याच्या काळामध्ये रेशन कार्डही खूप महत्त्वाची आहे. ज्यांना बाहेर जाऊन आपल्या रेशन कार्ड काढणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी स्वतःच्या मोबाईल मध्ये घरी बसल्या ॲपच्या माध्यमातून रेशन कार्ड तयार करू शकतात. त्यासाठी खाली दिलेल्या माहिती फॉलो करा.
- रेशन कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेरा राशन 2.0 हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावी लागेल.
- मेरा राशन 2.0 हे ओपन केल्यानंतर नवीन नाव नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधार कार्ड वरील नाव, कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव आधार प्रमाणे भरून घ्यावे लागेल.
- अशा पद्धतीने विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या त्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी त्या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्या तो ओटीपी भरल्यानंतर शेवटी अर्ज सादर करा या पर्यावरण क्लिक करा आपल्या मोबाईल नंबर वर एसएमएस देखील पाठवला जाईल अशा पद्धतीने आपण आपल्या रेशन कार्ड नवीन नोंदणी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता.
पोर्टल च्या माध्यमातून देखील काढू शकता रेशन कार्ड. सध्या अॅप वरुण नवीन नोंदणी होत नसेल तर आपण आपल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील आपली रेशन कार्ड नोंदणी करू शकतात.