बाल संगोपन योजना : चे नाव बदलून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेबद्दलची माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.
या अगोदर राज्यामध्ये बालसंगोपन ही योजना महाराष्ट्र राज्याची बाल न्याय नियमानुसार अनाथ मुले, निराश्रीत, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला – मुलींना संस्थेमध्ये त्यांचे पालन पोषण करण्याऐवजी त्यांना कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थांमधील वातावरणापेक्षा कुटुंब वातावरणामध्ये त्यांचे संगोपन व विकास घडून आणण्यासाठी राज्यामध्ये बालसंगोपन योजना राबविण्यात आलेली होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन ही योजना संस्थाबाह्य आहे या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला – मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपन करण्यासाठी ठेवण्यात येते. या योजनेअंतर्गत अनाथ मुले, निराधार, निराश्रीत, बेघर तसेच कैद्यांची मुले लाभ घेऊ शकतात, तसेच कोरोना काळामध्ये कोविडमुळे पालक मृत्यू पावल्याने अनाथ झालेली मुले या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतील, तसेच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्याची संख्या असंख्य असल्याने एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त बालकांना लाभ देण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आलेला असून, दोन पेक्षा जास्त बालके एकाच कुटुंबात संगोपनासाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
तसेच या योजनेअंतर्गत कार्य करत स्वयंसेवी लाभार्थ्यांची संख्या वाढ करण्यात येणार आहे. नवीन संस्थांना मान्यता व संस्था निवडीचे निकष, अनुदान पद्धत निश्चित करून. या अगोदरचे सर्व शासन निर्णय/परिपत्रक अधिक्रमित करून बालसंगोपन योजनेचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. याबद्दल पात्रता, लाभार्थी, मिळणारा लाभ, आवश्यक लागणारे कागदपत्रे, निकष ,अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे पात्रता आणि लाभार्थी
- या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना लाभ दिला जाणार आहे यामध्ये ज्या मुलांच्या पालकांचा अन्य कारणामुळे मृत्यू झालेला असेल अशा पालकांची मुले या योजनेअंतर्गत पात्र असतील.
- अनाथ किमान ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही आणि जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके या योजनेअंतर्गत पात्र असतील.
- एखाद्या बालकांना कुष्ठरोग झालेला असेल अशी बालके
- तसेच या योजनेअंतर्गत अविवाहित माता लाभ घेऊ शकेल.
- मतिमंद मुले
- अपंग मुले
- या योजनेअंतर्गत ज्या बालकाचे आई-वडील गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती आहेत.
- ज्या बालकाचे पालक मानसिक रुग्ण आहेत.
- या योजनेअंतर्गत अशी बालके ज्याची आई वडील घटस्फोटीत आहेत.
- आई – वडील अपंग असणाऱ्यांची बालके
- ज्या बालकांच्या आई वडिलाला एचआयव्ही झालेला आहे अशी बालके.
- एखाद्या गुणांतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
- ज्या बालकांच्या पालकांपैकी एक जणांचा मृत्यू होतो आणि एक जण कमवत नसेल अशा बालकांचा या योजनेअंतर्गत समावेश आहे.
- शाळेत न जाणारे बाल कामगार.
- कोविड सारख्या आजारामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांची बालके.
- भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके.
- कौटुंबिक हिंसाचार गुंतलेल्या पालकांची बालके.
वरील दिलेले हे सर्व बालसंगोपन योजनेसाठी पात्र असतील.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने अंतर्गत प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या परिपोषक अनुदानात आता 1 हजार 100 वरून 2 हजार 250 तर स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्यक अनुदानात 125 रुपये वरून 250 रुपये वाढ करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत दिलेल्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इत्यादी. सुविधा कुटुंबामार्फत पुरवले जातील.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना फायदे
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बालकांना दरमहा 2 हजार 250 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
- या अनुदानामुळे राज्यातील अनाथ व बेघर असलेल्या बालकांना आपले शिक्षण सोडण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत अनाथ आणि कमजोर बालकांना कोणतेही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- अनाथ बालकांना मजुरी करण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील बालकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल
- या योजनेअंतर्गत अनाथ बालकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना अटी व नियम
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बालकांना दिला जाईल.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील बालकांना दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ बालकांना 18 वर्ष होईपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या बालकांना दिला जाईल.
- बालकल्याण समितीच्या मान्यते शिवाय बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलांना अनुदान देण्यात येणार नाही.
- या योजनेचा लाभ बालकांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत दिला जाईल.
- या योजनेचा लाभ बालकांना वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार नाही.
बाल संगोपन योजने अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना रहिवासी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बालकाचे पालक कोणते काम करीत आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती.
- लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचा तसेच त्यांच्या घराचा एक फोटो.
- बालकाच्या पालकाचे आधार कार्ड
- पालकाचे महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षे वास्तव्याचा दाखला.
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते आवश्यक आहे.
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बालकाचे जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र.
- लाभार्थ्याच्या आई वडिलांचा मृत्यू झालेला असल्यास ,मृत्यू प्रमाणपत्र.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना स्वयंसेवी संस्थाची निवडीचे निकष
महिला व बालविकास विभाग, यांच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यातून बाल संगोपन योजना राबविण्यात येणार आहे. याकरिता स्वयंसेवी संस्थांचे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जमा करतील. आणि त्यानंतर संबंधित जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तपासणी करतील. आणि त्यानंतर शासनाकडून जिल्हा व कार्यक्षेत्र निहाय संस्था व लाभार्थी संकेत मान्यता प्रदान करण्यात आल्यानंतर. जिल्ह्यात बाल संगोपन योजनेचे काम सुरू करतील. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येणाऱ्या आदेशाच्या दिनांक पासून पाच वर्षासाठी राहील. तसेच स्वयंसेवा संस्थेस 200 पेक्षा जास्त मुलांसाठी मान्यता देण्यात येणार आहे.