crop insurance पिक विमा योजना या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1927 कोटी जमा होणार

crop insurance : पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामातील 2023 मधील झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने पिक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईसाठी 1927 कोटी रुपये लवकरात लवकर मिळतील, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.

crop insurance नुकसान भरपाई 1927 कोटी रुपयांची वाटप

crop insurance पिक विमा ही योजना राज्यामध्ये बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते. म्हणजे ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई झालेली आहे. अशा ठिकाणी 110% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देत आहे. त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देत आहे.

या माहितीनुसार खरीप हंगामातील 2023 मधील मंजूर 7,621 कोटी रुपयांपैकी विमा कंपनी मार्फत 5469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या अगोदर जमा करण्यात आलेले असून, तर आता उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी 1927 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यामध्ये विलंब होत आहे. पण आता ही रक्कम मंजूर झालेली आहे आणि वितरण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे . याबाबत 30 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

हे वाचा : रब्बी बियाणे अनुदान ,अर्ज करण्यास सुरुवात

हे आहेत 6 जिल्हे.

खालील दिलेल्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईचा मिळणारा लाभ

  • नगर- 713 कोटी रुपये
  • नाशिक – 656 कोटी रुपये
  • जळगाव – 470 कोटी रुपये
  • सोलापूर – 2.66 कोटी रुपये
  • सातारा – 27.73 कोटी रुपये
  • चंद्रपूर – 58.90 कोटी रुपये

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

Leave a comment