Bandkam kamgar Yojana : महाराष्ट्र राज्य मधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाने बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाचे योजना सुरू करण्यात आलेली आहे ती योजना म्हणजे महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्यता आणि विविध योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. आपण आज या लेखांमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना या विषयी माहिती पाहणार आहोत .
बांधकाम कामगाराच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MAHABOCW) ही संस्था कार्य करत आहे. केंद्र सरकारने या मंडळामार्फत MAHABOCW पोर्टल सुरू केलेले आहे, हे पोर्टल राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. या पोर्टलची सुरुवात महाराष्ट्र सरकारने 18 एप्रिल 2020 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील बांधकाम विभागातील सर्व बांधकाम काम करणाऱ्या कामगारांना लाभ दिला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे पोर्टल बांधकाम विभाग बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी बनवलेले आहे.
Bandkam kamgar Yojana उद्दिष्टे
बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्टे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांच्या भविष्यासाठी विविध उपाययोजना राबविणे हा आहे. विशेष म्हणजे,या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कोविडच्या काळामध्ये विविध योजनेने दिलासा मिळाला आहे.
भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाची भरती 14298 जागा.
Bandkam kamgar Yojana योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या बांधकाम कामगारांना 2000 रुपयापासून 5000 करुपया पर्यंत आर्थिक लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 12 लाख बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना या योजनेची आर्थिक मदत मिळाली आहे.
- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर स्वतःचा अर्ज करू शकता आणि बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो पण त्या व्यतिरिक्त, कामगारांना अनेक सुविधा आणि इतर लाभ पण दिला जातो.
महाराष्ट्र Bandkam kamgar Yojana लाभ घेण्यासाठी पात्रता आणि निकष असणे आवश्यक आहे.
- बांधकाम क्षेत्रात काम करणारा कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला हवे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी कमीत कमी 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असायला पाहिजे.
- बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असायला हवी.
Bandkam kamgar Yojanaअर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- हयात प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- रेशन कार्ड /ओळख प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्याची पद्धत
- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सर्वप्रथम mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर मुख्यपृष्ठावर Workers या पर्यावरण क्लिक करा आणि त्यानंतर Workers Registration निवडा
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर तुम्ही पात्रता संबंधित माहिती भरा आणि Check Eligibility या पर्यायवर क्लिक करा.
- पात्रता निश्चित झाल्यावर, नोंदणी फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरून घ्या.
- आणि त्यानंतर आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आणि आवश्यक लागणारे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेचे फायदे
- बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे बांधकाम कामगारांना आपल्या रोजच्या जीवनातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होते
- बांधकाम कामगार योजनेमुळे बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगारांना एक प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळते.
- महाराष्ट्र बांधकाम कामगार या मुख्य योजनेशिवाय, बांधकाम कामगारांना इतर अनेक कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो.
महाराष्ट्र बांधकाम कामगार ही योजना महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळाली असून, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे जीवनमानात सुधारणा होण्यास मदत झालेली आहे. बांधकाम कामगार या योजनेचा लाभ MAHABOCW या पोर्टलच्या माध्यमातून घेऊ शकतात.