गोशाळा प्रति गाय प्रति दिन 50 रू अनुदान ; देशी गाईंना मिळणार ‘राज्यमाता’ चा दर्जा : Goshala Anudan 2024

Goshala Anudan 2024 राज्यामधील गोशाळा मधील देशी गायींसाठी अनुदान देण्यात येणार आहे गाई म्हशींच्या पालन पोषण साठी प्रतिदिन प्रतीक गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशी गाईला राज्य मातेचा दर्जा देण्याचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत हा निर्णय घेणारा महाराष्ट्र हा देशांमधील पहिला राज्य असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Goshala Anudan 2024

Goshala Anudan 2024 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देत असताना ते म्हटले की देशी गाई हे आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत त्यामुळे तिला राजमाता चा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे यासोबतच गोठ्यामध्ये देशी गाईंचे संगोपन करण्यासाठी 50 रुपये प्रतिदिन अनुदान योजना राबविण्यात येणार आहे कमी उत्पन्नामुळे गोशाळा ना हा खर्च उचलता येत नव्हता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा : विहीर बांधणीसाठी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Goshala Anudan 2024 गोवंशिय पशुधनाची संख्या कमी :

सन 2019 मध्ये करण्यात आलेल्या 20 व्या पशु गणनेनुसार राज्यामध्ये 93 लाख 85 हजार 574 गोवंशिय पशुधन आहे एकात्मिक पाहणी योजनेच्या सन 2018-19 च्या अहवालानुसार देशी गाईंचे प्रतिदिन प्रतिकार दूध उत्पादन 3.4 लिटर आहे देशी गाईचे दूध उत्पादन तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्यामुळे देशी गोवंशिय पशुधनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे 19 व्या पशु गणना ची तुलना करता विसाव्या पशु गणनेमध्ये देशी गोवंशिय पशुधनाची संख्या 20.69 टक्क्यांनी कमी झालेली आहे.

सध्या राज्यामध्ये 828 नोंदणीकृत गोशाळा असून यामध्ये अंदाजे 1.5 लाख हून अधिक पशुधन आहेत गोशाळा आणि देशी गाईचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी परिपोषण आवश्यक असल्यामुळे मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने या गोष्टीचा विचार करून पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला सादर करून मंत्रिमंडळाने सोमवारी संमत केला आहे.

अनुदान थेट संस्थेच्या खात्यावर जमा :

Goshala Anudan 2024 या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे सर्व जनावरांचे भारत पशुधन प्रणाली वरती इयर टेकिंग करणे बंधनकारक राहील या योजनेसाठी गोसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत गोसेवा आयोगाकडील अर्जाची पडताळणी ही जिल्हा गोशाळा पडताळणी समितीच्या वतीने केली जाणार आहे त्यानंतर पात्र संस्थेला त्यांच्याकडे असलेल्या पशुधनात सरळ खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत.

Leave a comment