Crop Insurance : पीक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Crop Insurance : पीक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये अनुदान कोण कोणत्या मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहू या. गेल्या वर्षी 2023 मध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संघटना सामोरे जावे लागले. महाराष्ट्र मध्ये काही भागामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून पिक विमा योजना राबवण्यात आलेली आहेत. पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Crop Insurance शासन निर्णयाचा आढावा

29 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत, शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांची एक यादी तयार केलेली आहे. या 40 तालुक्यामधील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे. वितरित करण्यासाठी शासनाकडून अनेक नियम व पद्धती ठरवण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून योग्य लाभार्थ्यापर्यंत या लाभाची रक्कम याची काळजी घेतली जाणार आहे.
अनुदानाची रक्कम ही प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार दिली जाणार आहे. उदाहरणार्थ, ज्या शेतकऱ्यांचे एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र बाधित झाले आहे, त्या शेतकऱ्यांना किमान अनुदान दिले जाईल, आणि ज्या शेतकऱ्यांचे एक हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे अशा शेतकऱ्यांना जास्त अनुदान मिळेल. या अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात हे अनुदान दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

हे वाचा : सोन्याचा भावात आज देखील वाढ!

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यासाठी खालील दिलेले निकष पूर्ण करावी लागणार आहे.

  • या पिक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव 7/12 उताऱ्यावर असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने 2023 च्या खरीप हंगामात लावलेले असावेत.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे दुष्काळामुळे किमान 33% पेक्षा जास्त झालेले असावे.
  • शेतकऱ्यांचे आधार कार्डाशी संलग्र बँक खाते असणे आवश्यक आहे.
    या निकषाचे पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित क्षेत्रफळानुसार अनुदान दिले जाणार आहे. प्रत्येक पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल.

Crop Insurance या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या बाबींची नोंद घ्यावी

  • शेतकऱ्यांनी आपले नाव पात्र लाभार्थ्याच्या यादीमध्ये आहे की नाही हे तपासावे. यासाठी त्यांना स्थानिक तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
  • शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. जेणेकरून अनुदानाची रक्कम थेट आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होईल.
  • ज्या शेतकऱ्यांना असे वाटत आहे की आपण पात्र असूनही आपले या यादीमध्ये नाव आलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी.

Crop Insurance अनुदानाची रक्कम

Crop Insurance शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून सरकारकडून अनुदानाची रक्कम ठरवण्यात आलेली आहे. रक्कम शेतकऱ्यांना बाधित क्षेत्रफळानुसार ही अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. या रकमेमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल.

Leave a comment

Close Visit Batmya360