cotton soybean subsidy : राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 हजार रुपये या प्रमाणात अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार कापूस सोयाबीन अनुदान वाटपाची प्रक्रिया राबवण्यात आली. राज्य शासनाने यासाठी लागणारा निधी मंजूर करून कृषी विभागाला वितरित देखील केला आहे. परंतु यामध्ये आतापर्यंत फक्त 60 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान जमा करण्यात आलेला आहे. या योजनेत एकूण उर्वरित शेतकऱ्यांना हे अनुदान कधी जमा होणार याबद्दलची चिंता लागली होती तर या शेतकऱ्यांचे देखील अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
cotton soybean subsidy कुणाला मिळणार अनुदान
ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 हंगामामध्ये कापूस सोयाबीन ई पीक पाहणी द्वारे आपल्या सातबारे वर नोंद केली होती अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 हजार रुपये या प्रमाणात हे अनुदान वितरित केलं जाणार आहे. यासोबतच जास्तीत जास्त 2 हेक्टर च्या मर्यादित या प्रमाणात हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.
उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार अनुदान
कापूस सोयाबीन अनुदान अंतर्गत 60 लाख शेतकऱ्यांना या आधीच लाभ वितरित करण्यात आला आहे. परंतु उर्वरित 36 लाख शेतकऱ्यांना हा लाभ कधी मिळणार याची चिंता लागली होती. यासाठी लागणारा निधी राज्य शासनाने मंजूर करून कृषी विभागाला वितरितही केला आहे. परंतु हा निधी अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार सहमती पत्र कृषी विभागाला जमा केले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होत आहे.
हे वाचा: राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाले कापूस सोयाबीन अनुदान
अनुदान वाटपास का होत आहे विलंब ?
कापूस सोयाबीन अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांना वाटप झाला नाही. यामध्ये विविध कारण आहेत त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून कृषी सहाय्यक यांच्याकडे आपल्या आधार सहमती पत्र जमा केलेले नाहीत. आधार सहमति पत्र जमा जरी केले असतील तरी त्यांनी आणखी केवायसी पूर्ण केली नाही. केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांना हे अनुदान जमा होत नाही. या अश्या विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांचे अनुदान वाटपास विलंब होत आहे. बरेच शेतकऱ्यांनी पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे परंतु त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे त्यांना हा निधी वितरित करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या बँक खात्याशी आपल्या आधार कार्ड लिंक करून घ्यावे जेणेकरून हा लाभ तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा होईल.
येथे तपसा आपले अनुदान स्टेटस
कापूस सोयाबीन अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी सरकार ने एक पोर्टल तयार केले आहे. या पोर्टल वर शेतकऱ्यांना आपले आधार स्टेटस तपासता येणार आहे. https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता. या पोर्टल वर आपल्याला किती रक्कम मंजूर झाली व किती रक्कम कोणत्या बँक खात्यावर जमा झाली याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळेल.
1 thought on “उर्वरित शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार 5000 रुपये अनुदान. cotton soybean subsidy.”