Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसात कांद्याच्या दरात वाढ ,काय मिळतो कांद्याला दर पाहुया

Kanda Bajar Bhav : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळी सणाच्या अगोदर कांद्याला कमीत कमी दर हा 5 हजारापर्यंत होता. पण आता दिवाळी झाल्यानंतर मागील दोन दिवसात कांदा पिकाची आवक घटल्याने दरात अचानक पणे वाढ झाली आहे.6 नोव्हेंबर रोजी कमाल दर 7 हजार रुपयांपर्यंत मिळालेला आहे सरासरी कांद्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. सोलापूर बाजार समितीत आता जुन्या कांदा बरोबरच नवीन कांद्याची आवक वाढली आहे.


दिवाळी सणाच्या तोंडावर सुट्टी असल्याने 29 ऑक्टोबर रोजी टब्बल 761 ट्रक कांद्याची आवक होती. त्यावेळेस सरासरी दरात मोठी घसरन झालेली पाहायला मिळाली होती. प्रती क्विंटल 1600 रुपये सरासरी दर मिळाला.
आता दिवाळी सुट्टीनंतर अवक वाढण्याची शक्यता होती पण मात्र कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी आणलेला नाही. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत सोमवारी 313 ट्रक कांद्याची आवक झाली . त्यामुळे कमाल दर 6225 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तसेच सरासरी कांद्याच्या दरामध्ये दुपटीने म्हणजेच दीड हजारावरून 3 हजारावर कांद्याचा दर पोहोचलेला होता. आणि मंगळवारी 308 ट्रक कांद्याची आवक होती. सोमवारच्या तुलनेत पुन्हा कांदा दरात वाढ झाली. मंगळवारी कमाल दर 7100 रुपये मिळाला. तर सरासरी दर हा 3100 रुपये होता. अचानक कांदा आवक घटल्याने दरामध्ये वाढ झाल्याची सांगण्यात आले आहे.

ड्रॅगन फ्रुट अनुदान किती दिले जाते, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

आता आवक आणखी वाढणार Kanda Bajar Bhav

सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा आता विक्रीला येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिने आवक मोठी राहणार आहे सरासरी रोज 500 ट्रक कांद्याची आवक राहण्याची शक्यता आहे . सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून, बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तसेच शेतकऱ्यांना कच्चा माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहल करण्यात आले.

Leave a comment