लाडकी बहीण योजनेच्या पैशातून मिळवा 3 लाख रुपये : post Office RD Yojana

post Office RD Yojana : महिलांसाठी राज्यामध्ये राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना राबवून पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलांना या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये लाभ दिला जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये जमा देखील करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे मिळतात ते पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही सुरक्षित व ठराविक परतावा देणारी योजना गुंतवणूक साठी शोधत असाल तर, तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस आरडी स्कीम हा उत्तम पर्याय आहे.

या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवू शकतात. या पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपये गुंतवता येतात आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार गुंतवू शकतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पोस्ट ऑफिस मधले पैसे बुडत नाहीत कारण ते सरकारी विभाग आहे. जर तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडी स्कीम चा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी पोस्ट ऑफिस आरडी योजनेसाठी अकाउंट उघडावे लागेल मग हे अकाउंट कसे उघडायचे, याची प्रक्रिया काय आहे याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहूया.

post Office RD Yojana आरडी स्कीम काय आहे?

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमला काही नागरिक आरडी स्कीम असे म्हणतात. तुम्ही या योजनेमध्ये दर महिन्याला पैसे जमा करू शकतात . आणि तुम्हाला या योजनेमध्ये जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळते. आरडी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला उत्कृष्ट रिटर्न मिळतो. पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.70 टक्के व्याज मिळते . आरडी स्कीम अंतर्गत प्री मॅच्युअर अकाउंट क्लोजर व लोन सुविधा पण मिळतात.

हे वाचा : पोस्ट ऑफीस ची दामदुप्पट योजना ; पहा कशी करावी गुंतवणूक

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम किती वर्षासाठी असते

post Office RD Yojana ही नोकरी दारासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच त्याबरोबरच या योजनेत सर्वसामान्य नागरिकांना देखील गुंतवणूक करता येते. जर तुम्ही छोटी – मोठी नोकरी करत असाल तर तुम्ही तुमच्या पगारातील ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिस च्या आरडी स्कीम मध्ये तुम्हाला पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते, पण तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त काळासाठी गुंतवणूक करू शकाल तेवढा जास्त नफा तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळेल.

पोस्ट ऑफिस च्या योजनेतून काही वेळा काही कारणामुळे आरडी मध्ये जर तुम्ही पैसे जमा करू शकला नाहीत, आणि तुम्हाला हे पैसे एकलगट सहा महिने भरण्यात आले नाही तर तुमचे अकाउंट बंद होईल. पण तुम्ही त्यानंतर दोन महिन्याच्या आत पैसे भरून पुन्हा एकदा अकाउंट चालू करू शकतात. पण मात्र , सहा महिने पैसे न भरल्यास हे अकाउंट कायमस्वरूपी बंद होऊ शकते.

Leave a comment