cibil score RBI चे 6 नवीन नियम: जाणून घ्या सविस्तर माहिती

cibil score क्रेडिट स्कोअर संबंधित तक्रारी वाढल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही महत्त्वाचे बदल केले आहेत. CIBIL स्कोअर उत्तम असल्यास कर्ज मिळवणे सोपे होते, परंतु तो राखण्यासाठी चुका टाळण्याची गरज असते. आता RBI ने 6 नवीन नियम लागू केले आहेत, जे ग्राहकांना लाभदायक ठरतील. तर आज आपण या लेखा मध्ये जाणून घेऊयात या 6 नियमांबद्दल सविस्तर माहिती. 

1. cibil score दर 15 दिवसांनी अपडेट होणार

नवीन नियमानुसार, ग्राहकांचा CIBIL स्कोअर दर 15 दिवसांनी अपडेट केला जाणार आहे . हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. ग्राहकांचे CIBIL स्कोअर दर महिन्याच्या 15 तारखेला आणि शेवटी अपडेट केले जाऊ शकतात. 
फायदा:

  • CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी अधिक संधी मिळेल आणि लोकांना देखील फायदा होईल.
  • बँकांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

2. क्रेडिट तपासणीची माहिती ग्राहकाला पाठवावी लागणार 

cibil score बँक किंवा NBFC ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर तपासताना ग्राहकाला त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठवली जाऊ शकते. क्रेडिट स्कोर बाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या त्यामुळे रिझर्व बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. पाठविली जाईल.
फायदा:

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज
  • ग्राहकांना त्यांचा क्रेडिट स्कोअर तपासण्याचा अंदाज येईल.
  • अपारदर्शक प्रक्रियेला आळा बसेल.

3. विनंती नकाराच्या कारणांची माहिती द्यावी लागेल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकाची क्रेडिटसाठी केलेली विनंती नाकारल्यास त्याचे कारण स्पष्ट करणे आवश्यक आहे. विनंती ना करण्याच्या कारणाची यादी तयार करणे आणि ती सर्व क्रेडिट संस्थांना पाठवणे आवश्यक आहे.

4. मोफत वार्षिक क्रेडिट रिपोर्ट

cibil score रिजवर बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कंपनीने त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा विनामूल्य पूर्ण क्रेडिट स्कोअर प्रदान केला पाहिजे. यासाठी क्रेडिट कंपनीला त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक द्यावी लागेल जेणेकरून ग्राहकांना त्यांचा विनामूल्य संपूर्ण क्रेडिट अहवाल सहज तपासता येईल. यामुळे ग्राहकांना त्यांचा CIBIL स्कोर आणि वर्षातून एकदा पूर्ण क्रेडिट माहिती मिळेल.
फायदा:

  • ग्राहक त्यांच्या आर्थिक स्थितीचे अचूक मूल्यमापन करू शकतील.
  • cibil score आणि इतिहास जाणून सुधारणा करण्याची संधी मिळेल.

5. डिफॉल्टची माहिती आधी द्यावी लागेल

जर ग्राहक डिफॉल्ट करणार असेल, तर त्याची तक्रार करण्यापूर्वी त्याला SMS किंवा ईमेलद्वारे माहिती देणे बंधनकारक आहे.
फायदा:

हे पण वाचा:
Gas Cylinder E KYC Update Gas Cylinder E KYC Update: गॅस सिलेंडर वापरताय? मग हे काम 15 ऑगस्टपर्यंत नक्की करा, नाहीतर सिलेंडर मिळणार नाही.
  • ग्राहकांना आर्थिक नियोजनासाठी वेळ मिळेल.
  • तक्रारी कमी होतील.

6. तक्रार निवारणाची 30 दिवसांची मर्यादा

ग्राहकांच्या तक्रारी 30 दिवसांच्या आत सोडवणे बंधनकारक आहे. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित संस्थेला प्रतिदिन 100 रुपये दंड द्यावा लागेल.म्हणजेच जितका उशीरा ग्राहकांच्या तक्रारीचे निराकारण होईल, तेवढा अधिक दंड भरपाई करावा लागेल. कर्ज वाटप करणाऱ्या संस्थेला 21 दिवस आणि क्रेडिट ब्युरोला 9 दिवस एवढा कालावधी मिळेल. बँकेने जर 21 दिवसाच्या आत मध्ये क्रेडिट ब्युरोल माहिती दिली नाही तर याची नुकसान भरपाई बँक देईल. बँकेकडून माहिती दिल्यानंतर दिवसानंतर तक्रारीचे निराकारण न केल्यास क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई भरावी लागेल.
फायदा:

  • ग्राहक सेवा सुधारेल.
  • तक्रारींवर जलद तोडगा निघेल.

ग्राहकांसाठी मोठा फायदा

हे नियम ग्राहक केंद्रित असून क्रेडिट प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवतील. यामुळे CIBIL स्कोअर सुधारण्याची अधिक संधी मिळेल आणि तक्रार निवारण प्रक्रिया वेगवान होईल.

तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी वेळेवर पेमेंट करणे आणि योग्य आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा:
Soyabean Rate Soyabean Rate: सोयाबीनचा भाव वाढला, ₹6,000 होणार? जाणून घ्या आजचे दर

Leave a comment