agri drone subsidy ड्रोन अनुदान योजना: ड्रोन साठी अर्ज करायचा आहे,तर पहा, कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया,अटी व नियम सविस्तर माहिती.

agri drone subsidy ड्रोन अनुदान योजना : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जानेवारी 2022 मध्ये सुरू केलेली ड्रोन अनुदान योजना आता महाराष्ट्रातही प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना शेतीसाठी ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आता ही योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्जासाठी उपलब्ध आहे . तर आज आपण या लेखाका मध्ये ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, या अनुदानाचा लाभ कोणाला दिला जाईल, आवश्यक लागणारी कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

agri drone subsidy आवश्यक लागणारी कागदपत्रे

  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • ड्रोन चे कोटेशन बिल
  • स्वयंघोषणापत्र
  • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • कृषी पदवी

हे वाचा : शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ड्रोन; ऑनलाइन अर्ज सुरू.

ड्रोन अनुदान योजना अर्ज कसा करावा?

agri drone subsidy महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. महाडीबीटी पोर्टलला भेट द्या:
  2. अर्ज प्रक्रिया सुरू करा:
    • मुख्य पृष्ठावर “प्रोफाइल 100% पूर्ण” असल्याची खात्री करा.
    • “अर्ज करा” या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. कृषी यांत्रिकीकरण निवडा:
    • “कृषी यांत्रिकीकरण” पर्याय निवडून आवश्यक माहिती भरा.
    • सर्व तपशील भरून “जतन करा” वर क्लिक करा.
  4. अटी-शर्ती मान्य करा:
    • योजनेच्या अटी व शर्ती वाचा आणि त्याला मान्यता द्या.
  5. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा:
    • अर्ज सादर करण्यासाठी 23.60 रुपये ऑनलाइन पद्धतीने भरावे लागतील.
    • क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI वापरून पेमेंट करा.
  6. अर्ज सबमिट करा:
    • पेमेंट झाल्यावर अर्ज सबमिट होईल. अर्जाची स्थिती “मी अर्ज केलेल्या बाबी” विभागात पाहता येईल.

ड्रोन अनुदान योजना पात्रता निकष

  1. कृषी पदवीधारक विद्यार्थी:
    • कृषी पदविका किंवा कृषी शाखेतील पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र आहेत.
  2. शेतकरी उत्पादक गट आणि उद्योजक:
    • नोंदणीकृत शेतकरी संस्था किंवा 10 वी पास ग्रामीण उद्योजक देखील अर्ज करू शकतात.

ड्रोन अनुदान योजना अनुदानाचे स्वरूप

  1. व्यक्तिगत कृषी पदवीधारक:
    • 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे .
  2. शेतकरी गट किंवा उद्योजक:
    • 40% किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे .

ड्रोन अनुदान योजना अर्जासंबंधित महत्त्वाची माहिती

  • अर्जाची स्थिती आणि पुढील प्रक्रिया पोर्टलवर “छाननी अंतर्गत अर्ज” विभागात पाहता येईल.
  • पात्र लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाईल.
  • ड्रोन खरेदी व पूर्वसंमतीसाठी कागदपत्रे अपलोड करण्याची सूचना नंतर दिली जाईल.

निष्कर्ष

agri drone subsidy ड्रोन अनुदान योजना शेतकऱ्यांना शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवण्याची संधी देते. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसह ही योजना सुलभ आणि पारदर्शक बनली आहे. लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आजच अर्ज करा!

2 thoughts on “agri drone subsidy ड्रोन अनुदान योजना: ड्रोन साठी अर्ज करायचा आहे,तर पहा, कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया,अटी व नियम सविस्तर माहिती.”

Leave a comment

Close Visit Batmya360