MMLBY UPDATE : लाडक्या बहिणींना 1500 की 2100 किती मिळणार लाभ.

MMLBY UPDATE महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे. परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू केलेली ही योजना आणि महायुती सरकारने निवडणुकी दरम्यान जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असल्याची घोषणा केली. परंतु महिलांना नेमके किती पैसे मिळणार याबाबतची माहिती नसल्यामुळे महिलांचे मनात विविध संभ्रम निर्माण होत आहेत.

MMLBY UPDATE

महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यामध्ये राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु महिलांना आता मिळत असलेली रक्कम ही पंधराशे प्रमाणेच मिळत आहे. यावर महिलांना नेमकी 2100 रुपये प्रति महिना मिळणार की 1500 रुपये प्रति महिना मिळणार याबाबतची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MMLBY UPDATE महिलांच्या मनात संभ्रम कायम

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना डिसेंबर चा हप्ता वितरित करण्यात सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा देखील झाली आहे. यामध्ये सर्वच महिलांना 1500 रुपये याप्रमाणे रक्कम जमा झाली आहे. सरकारने जाहीरनाम्यात 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तरी पंधराशे रुपये का असा प्रश्न पात्र असणाऱ्या सर्वच महिलांच्या मनात निर्माण होत आहे.

हे वाचा: महिलांच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा

कधी मिळू शकतात 2100 रुपये

MMLBY UPDATE लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या राज्यातील महिलांना 2100 रुपये प्रति महिना देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असे जाहीरनाम्यात देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु ही रक्कम निवडणूक झाली की लगेच मिळेल अशी अपेक्षा राज्यातील सर्वच महिलांना होती. परंतु या पद्धतीने रक्कम वितरित केली जाऊ शकत नाही, त्यासाठी शासनाला काही तरतुदी व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असतं. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान याची घोषणा केली जाऊ शकते आणि त्यानंतरच महिलांच्या बँक खात्यावर 2100 रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली जाऊ शकते. परंतु सद्यस्थितीमध्ये तरी अशी कोणत्याही प्रकारची घोषणा किंवा आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांना 1500 रुपये प्रति महिना याच प्रमाणे रक्कम वितरित केली जाणार आहे.MMLBY UPDATE

काय म्हणाल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन आपल्या सरकारने दिले होते; असा प्रश्न महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना विचारला असता त्यांनी माहिती दिली की, आम्ही आश्वासन दिलेले आहे. परंतु डिसेंबर पासूनच आम्ही महिलांना 2100 रुपये देणार अशा कोणत्याही पद्धतीचे आम्ही आश्वासन किंवा घोषणा केलेली नव्हती. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे त्यामुळे महिलांना सद्यस्थितीमध्ये तरी पंधराशे रुपये याप्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे.

Leave a comment