ativrushti anudan 2024 : अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा.

ativrushti anudan 2024 खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली होती. अतिवृष्टीने बाधित या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत जाहीर केली होती. राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आनेवारी नुसार अनुदान वाटप करण्याचे धोरण आखले.

ativrushti anudan 2024

राज्यातील प्रत्येक महसूल मंडळानुसार आनेवारी वेगवेगळी ठरवण्यात आली होती. या आनेवारीनुसार नुकसान बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्यासाठी स्थानिक स्तरावरून हालचाली सुरू करण्यात आल्या. ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला. या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना आता अनुदान रक्कम जमा होण्यास सुरू झालेले आहे.

ई केवायसी कोठे करावी ativrushti anudan 2024

अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी यादीमध्ये आपले नाव असल्यास आपली केवायसी करणे बंधनकारक आहे. केवायसी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान वितरित केले जाणार आहे. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपल्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी. लक्षात असू द्या केवायसी करण्यासाठी स्वतः शेतकरी ही केवायसी करू शकत नाहीत; त्यामुळे केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊनच आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी लागणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana July Hafta Ladki Bahin Yojana July Hafta: लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार GR आला, कोणाला मिळणार हप्ता?

अनुदान वितरण सुरु

ativrushti anudan 2024 मागील एक ते दीड महिन्यापासून शेतकऱ्यांनी आपल्या अनुदान केवायसी पूर्ण करून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात आलेले नव्हते शासनाने यादी 30 जानेवारीपर्यंत अनुदान जमा केले जाईल अशी माहिती दिली होती परंतु 30 जानेवारी पर्यंत देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा झालेले नव्हते परंतु आता म्हणजेच 6 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम जमा होत आहे.

शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन!

ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होत आहे. अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी जेणेकरून आपले अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा केले जाईल.

हे पण वाचा:
Mirchi Halad Kandap Machine Yojana Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची आणि हळद कांडप मशिनसाठी 50,000 अनुदान! आता 31जुलै पर्यंत असा करा अर्ज!

अनुदान कोणत्या खात्यावर होणार जमा.

बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान कोणत्या बँक खात्यात जमा होणार याची कल्पना नाही. करण विशिष्ट क्रमांक तयार करण्यासाठी दिलेले बँक खाते वेगळे असून अनुदान वेगळ्या बँक खात्यावर जमा होत असल्याची बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. याचे कारण जे अनुदान जमा होत आहे हे डीबीटी अंतर्गत जे बँक खातं आपलं लिंक आहे त्या बँक खात्यावर शेतकऱ्यांचा अनुदान जमा केलं जात आहे. हा लाभ डीबीटी अंतर्गत म्हणजेच शेतकऱ्यांचे आधार संलग्न असणारे बँक खाते. आधार संलग्न या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली जात आहे. ativrushti anudan 2024

Leave a comment