पाईप लाईन योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे . शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत पाईपलाईन करून मिळणार आहे . पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल, अर्ज कसा करायचा, त्यासाठी पात्रता काय आहे, कोण कोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहे, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा की ऑनलाईन पद्धतीने करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत (NFSM),सिंचनासाठी पाईप खरेदीवर अनुदान देण्याची योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 50% अनुदान देण्यात येणार आहे . त्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 जानेवारी 2025 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
हे वाचा: महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना
पाईप लाईन योजना वैशिष्ट्ये आणि लाभ
शेतीसाठी सिंचन व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना खालील प्रकारच्या पाईप्सवर अनुदान मिळणार आहे:
- एचडीपीई पाईप (HDPE): प्रति मीटर ₹50 अनुदान
- पीव्हीसी पाईप (PVC): प्रति मीटर ₹35 अनुदान
- एचडीपीई लाईन रिलेटेड विनाईल फॅक्टर: प्रति मीटर ₹20 अनुदान
उदाहरणार्थ: जर एखाद्या शेतकऱ्याने 200 मीटर एचडीपीई पाईप खरेदी केली तर त्याला ₹10,000 अनुदान मिळेल. याचप्रमाणे, 100 मीटर पीव्हीसी पाईपसाठी ₹3,500 आणि एचडीपीई लाईन विनाईल फॅक्टरसाठी ₹2,000 अनुदान देण्यात येईल .
पाईप लाईन योजना अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा (अद्ययावत)
- आधार कार्ड
- बँक पासबुक (अर्जदाराच्या नावावर)
- रहिवासी दाखला
- पाणीपुरवठ्याचा पुरावा (आवश्यक असल्यास)
पाईप लाईन योजना पात्रता निकष
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- शासनाने निश्चित केलेल्या इतर पात्रता निकषांची पूर्तता आवश्यक आहे.
पाईप लाईन योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर जावे लागेल.
- त्यानंतर नवीन युजर असल्यास रजिस्ट्रेशन करा किंवा असलेल्या अकाउंट वर लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला NFSM अंतर्गत पाईप अनुदान योजना हा पर्याय निवडा
- त्यानंतर आवश्यक ती माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि लागणारी कागदपत्रे अपलोड करा .
- त्यानंतर फॉर्म सबमिट करा व त्याची प्रिंट काढून ठेवा.
- अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करून शकाल.
महत्वाच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना शेवटच्या क्षणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
- अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी CSC सेंटर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा स्वतः महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज भरू शकतात.
- त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे आधीच स्कॅन करून ठेवावेत. अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. आणि त्याचा संदर्भ क्रमांक जपून ठेवावा. अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहवी .
राज्य शासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतीचे आधुनिकीकरण करावे आणि उत्पादन वाढवावे. सिंचन व्यवस्थेतील सुधारणा झाल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल आणि उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे, या योजनेसाठी त्वरित अर्ज करा आणि सरकारच्या मदतीचा लाभ घ्या!
पाईप लाईन योजना महा डीबीटी अंतर्गत सर्व घटकांचा लाभ देण्यासाठी लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. पाइप लाइन अनुदान देखील लॉटरी पद्धतीने निवड होणाऱ्या शेतकऱ्यांनाच वितरित केले जाते. या मध्ये निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने असल्यामुळे अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेलच अस नाही. पाईप लाइन अनुदान लाभ फक्त लॉटरी अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना दिला जातो.