Mnrega Falbag Lagwad Yojana मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी.

Mnrega Falbag Lagwad Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA) अंतर्गत शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शेतीला बळकटी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीसोबतच प्रशासनाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mnrega Falbag Lagwad Yojana

Mnrega Falbag Lagwad Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य

वाशिम जिल्ह्यात ‘मनरेगा’ अंतर्गत 785 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. यामध्ये 812 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून, त्यांना आर्थिक मदत तसेच तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे. ही योजना राज्यभर प्रभावीपणे राबवली जात असून, शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवडीतून अधिक नफा मिळवण्याची संधी उपलब्ध होत आहे.

हे वाचा : महाराष्ट्र दिव्यांग ई-रिक्षा योजना असा करा ऑनलाइन अर्ज.

Mnrega Falbag Lagwad Yojana कृषी विभागाकडून कोणत्या फळझाडांसाठी अनुदान दिले जाते?

मनरेगा अंतर्गत सरकारकडून फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान दिले जाते, परंतु यासाठी काही अटी आणि शर्ती लागू होतात त्याचे लाभार्थ्यांनी पालन करावे . यामध्ये लाभार्थ्याने ठरवून दिलेल्या झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. लागवडीनंतर झाडांची योग्य देखभाल आणि निगा राखणे गरजेचे आहे. अनुदान तीन टप्प्यांत मिळते आणि प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्ष निरीक्षण करून निधी वितरित केला जातो. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आणि लागवडीसाठी आवश्यकतेनुसार सिंचन सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे.

खालील फळझाडांच्या लागवडीसाठी शासनाकडून मदत मिळते:

  • आंबा
  • पेरू
  • लिंबू
  • सीताफळ
  • संत्रा
  • मोसंबी

Mnrega Falbag Lagwad Yojana फायदे

  • रोजगार निर्मिती: शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो, तसेच या योजनेमुळे ग्रामीण भागातील अने तरुणाना रोजगार रोजगार संधी निर्माण होईल.
  • शाश्वत शेती: फळबाग लागवड केल्याने शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थिरता मिळते. पारंपरिक शेतीपेक्षा कमी जोखीम आणि जास्त नफा मिळण्याची संधी मिळते .
  • सरकारी अनुदान: शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 50,000 रुपये अनुदान तीन टप्प्यांत मिळते, ज्यामुळे लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात भरून निघतो.
  • सिंचन सुविधा: या योजनेअंतर्गत योग्य व्यवस्थापनाद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढते.
  • मातीचे संवर्धन: फळबाग लागवडीमुळे मातीची धूप थांबते, पर्यावरणीय संतुलन राखले जाते आणि जमिनीचा पोत सुधारतो.

अनुदानाची विभागणी कशी असते?

  • पहिल्या वर्षी: एकूण अनुदानाच्या 60% (30,000 रुपये पर्यंत)
  • दुसऱ्या वर्षी: 25% अनुदान
  • तिसऱ्या वर्षी: उर्वरित 15% अनुदान

या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो?

  • लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी 0.05 हेक्टर आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्र असायला पाहिजे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लाभार्थ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर किंवा ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि मनरेगा कार्यालयात संपर्क साधून अर्ज करू शकतात.

Mnrega Falbag Lagwad Yojana अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा (7/12)
  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर

Mnrega Falbag Lagwad Yojana अर्ज करण्याची पद्धत

  • शेतकऱ्यांना मनरेगा फळबाग लागवड योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर जर नवीन अर्जदार असेल तर स्वतःची नोंदणी करावी लागेल, किंवा आधीच्याच खात्यात लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर कृषी विभाग अंतर्गत ‘प्रमाणित फळबाग लागवड अनुदान’ योजना या पर्यावरण क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर आवश्यक लागणारी सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि आवश्यक लागणारे कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करून ठेवा.
  • अशा पद्धतीने तुम्ही फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकाल

अर्ज संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत किंवा कृषी विभाग किंवा मनरेगा कार्यालयात संपर्क साधावा.

मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड 2024-25 प्रकल्प

  • 785 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण
  • 812 शेतकऱ्यांना लाभ मिळाला
  • जलसंधारण व सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत

Mnrega Falbag Lagwad Yojana शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात. ही योजना शेतकऱ्यांसाठी दिर्घकालीन आर्थिक स्थिरतेचे दार उघडणारी संधी आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित असाल, तर महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करा आणि आजच अर्ज सादर करा!

Leave a comment

Close Visit Batmya360