Ration Card E-KYC :रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना! ई-केवायसी न केल्यास नाव होणार रद्द…!

Ration Card E-KYC : रेशन प्रणालीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांनाच शिधा मिळावा यासाठी शासनाने रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यासाठी रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी .अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकतात.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ration Card E-KYC

जिल्ह्यातील सध्या स्वस्त धन्याचा पुरवठा

जिल्ह्यातील 3,74,335 रेशन कार्डधारकांना सरकारी स्वस्त धान्याचा पुरवठा सध्या होत आहे . यामध्ये अनेक बोगस रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य पुरवठा होत आहे, हा पुरवठा होऊ नये म्हणून यासाठी पुरवठा विभागाद्वारा विभाग उपाय योजले जातात. त्यामुळे रेशन कार्डधारकांना तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडील पॉस मशीनद्वारे ई -केवायसी (Ration Card E-KYC) करणे आवश्यक आहे. यासाठी मागील दोन वर्षापासून पुरवठा विभागाद्वारा रेशन धारकाकडे सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे. यासाठी आतापर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली असताना अद्याप 32.65 टक्के लाभार्थ्यांनी ई- केवायसी केलेली नाही. मध्यंतरी काही दिवस पॉस मशीन बंद होत्या. त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत सुरू आहे तरी पण मात्र रेशन लाभार्थ्याद्वारा ही प्रक्रिया करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

हे वाचा : महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ!

ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ

रेशन कार्डधारकांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 28 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत ई – केवायसी (Ration Card E-KYC) न केलेल्या लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून काढली जातील आणि त्यांना रेशन मिळणार नाही.

Ration Card E-KYC ई-केवायसी का गरजेचे आहे?

  1. बोगस लाभार्थ्यांना रोखणे – सरकारच्या योजनेचा लाभ फक्त गरजू नागरिकांनाच मिळावा, म्हणून सत्यापन करणे महत्त्वाचे आहे.
  2. ओळख व पत्त्याची खातरजमा – आधार क्रमांकाशी संलग्नता तपासून लाभार्थ्याची खरी ओळख निश्चित केली जाते.
  3. सर्व लाभार्थ्यांचे सत्यापन अनिवार्य – रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्याने स्वतःचे आधार कार्ड तपासणीसाठी सादर करणे गरजेचे आहे.

Ration Card E-KYC ई-केवायसी कशी करावी?

रेशन कार्डधारकांना त्यांच्या (Ration Card E-KYC) रेशन दुकानात जाऊन आधार कार्ड आणि शिधापत्रिका सोबत नेऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पॉस मशीनद्वारे पूर्ण केली जाते.

रेशन ई-केवायसी न केल्यास काय परिणाम होतील?

  • शिधापत्रिकेवरील ज्या सदस्यांचे सत्यापन झाले नाही, त्यांची नावे काढली जातील.
  • लाभार्थ्यांना रेशनचे अन्नधान्य मिळणार नाही.
  • सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरू शकतात.

रेशन कार्डधारक ई-केवायसी करण्यास टाळाटाळ का करत आहेत?

  • अनेक लाभार्थ्यांना ही प्रक्रिया करण्याची गरज नाही असे वाटते.
  • काही जणांची आधार कार्डशी तफावत आढळते, त्यामुळे ते सत्यापन करण्यास संकोच करतात.
  • काही भागांमध्ये पॉस मशीनद्वारे प्रक्रिया वेळोवेळी बंद राहिल्याने अडचणी आल्या आहेत.

Ration Card E-KYC महिन्याचे धान्य देखील मिळणार नाही

  • प्रधान्य गट लाभार्थी- 15,12,130
  • ई- केवायसी बाकी- 6,75,377
  • अंत्योदय लाभार्थी – 4,78,548
  • प्रधान्य गट कार्ड – 3,74,335
  • अंत्योदय – 1,28,207

ई-केवायसी बाकी असलेल्या तालुका निहाय लाभार्थी आकडा

  • अंचलपुर 76,456
  • तहसील 40,153
  • मोर्शी 36,363
  • अंजनगाव 35,705
  • भातुकली 28,797
  • चांदूर रेल्वे 17,224
  • चांदूर बाजार 61,330
  • चिखलदरा 34,938
  • दर्यापूर 31,664
  • धामणगाव रेल्वे 28,736
  • धारणी 59,399
  • नांदगाव खंडेश्वर 18,333
  • तिवास 28,152
  • वरुड 42,642 व अमरावती एफडीओ मध्ये 1,356,483 लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही .

रेशन लाभार्थ्यांसाठी आवाहन

रेशन लाभ घ्यायचा असेल तर 28 फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. केवळ आधार कार्ड आणि शिधापत्रिका आवश्यक आहे, त्यामुळे विलंब न करता जवळच्या रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया करून घ्या. तुमच्या अधिकाराचा लाभ घ्या आणि अन्नधान्याचा पुरवठा नियमित सुरू ठेवा. Ration Card E-KYC

Leave a comment

Close Visit Batmya360