PM Dhan Dhanya Krushi Yojana :पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार ,पहा या योजनेचे उद्दिष्ट आणि सविस्तर माहिती

PM Dhan Dhanya Krushi Yojana : 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना (पीएमडीकेवाय) सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे हा आहे. तर आज आपण या लेखामध्ये जाणून घेऊया काय आहे पंतप्रधान धन – धान्य कृषी योजना? या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ? या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा होणार तसेच या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया .

PM Dhan Dhanya Krushi Yojana

PM Dhan Dhanya Krushi Yojana काय आहे या योजनेची उद्दिष्ट ?

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा मुख्य उद्देश देशातील कमी उत्पादकतेचे जिल्हे ओळखून तेथे कृषी विकासासाठी विशेष प्रयत्न करणे हा आहे. या अंतर्गत:

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
  • पाण्याचे योग्य व्यवस्थापन
  • मातीच्या आरोग्याची तपासणी
  • शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सहाय्य

यामुळे शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होईल, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

हे वाचा : सरपंचांच्या पगारात वाढ, राज्य सरकारचा निर्णय !

PM Dhan Dhanya Krushi Yojana अंमलबजावणीची प्रक्रिया

या योजनेची अंमलबजावणी 100 जिल्ह्यांमध्ये केली जाणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादन कमी आहे, अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. असे सितारामन म्हणाल्या होत्या.सूत्रानुसार, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय या पॅरामीटर्सचा डेटा गोळा करत आहे, ज्याच्या आधारावर जिल्ह्यांची ओळख केली जाणार आहे.पिकाची तीव्रता ही जमीन किती कार्यक्षमतेने वापरली जाते याचे मोजमाप आहे. एकूण पीक क्षेत्र ते निव्वळ पेरणी केलेल्या क्षेत्राची टक्केवा,री अशी याची व्याख्या केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पिकाची तीव्रता एका कृषी वर्षात(जुलै-जून)जमिनीच्या तुकड्यावर किती पीक घेतले जाते हे दाखवते.

आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाची प्रेरणा

या योजनेची (PM Dhan Dhanya Krushi Yojana) प्रेरणा आकांक्षी जिल्हा कार्यक्रम (ADP) यशस्वी झाल्यामुळे मिळाली आहे. जानेवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम सुरू केला होता. या योजनेचा उद्देश कमी विकसित जिल्ह्यांमध्ये जलद गतीने बदल घडवून आणणे हा होता.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

PM Dhan Dhanya Krushi Yojana शेतीतील बदल आणि भविष्यातील दिशा

पीक उत्पादनवाढीच्या उद्देशाने 202 -22 मध्ये पीक तीव्रता 155 टक्के नोंदवली गेली. 1950-51 मध्ये ही तीव्रता 111 टक्के होती. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी कर्जपुरवठा आणि प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना ही देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा आहे.

योजनेची प्रमुख उद्दिष्टे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेच्या (PM Dhan Dhanya Krushi Yojana) पाच प्रमुख उद्दिष्टांचा उल्लेख केला आहे:

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज
  • कृषी उत्पादकता वाढवणे
  • पीक विविधीकरण आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब
  • पंचायत आणि ब्लॉक स्तरावर साठवणूक क्षमता वाढवणे
  • सिंचन सुविधा सुधारणे
  • दीर्घकालीन व अल्पकालीन कर्जाची सुलभता

या योजनेमुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसल्यानं, कृषी मंत्रालय व इतर संबंधित मंत्रालयांतील निधीतून या योजनेसाठी रक्कम प्रदान केली जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि सुविधा

केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या योजनेतून शेतकऱ्यांना उच्च दर्जाची बियाणे, आवश्यक खते, आधुनिक शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री, तसेच तंत्रज्ञानाचा वापर शिकण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून देशाच्या कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता या योजनेत आहे. PM Dhan Dhanya Krushi Yojana

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार

Leave a comment