Pratap Sarnaik : राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना आणि एसटी तिकिटात 50 टक्के सवलत या योजना विशेष महत्त्वाच्या ठरल्या आहेत . पन मात्र, या सवलतीमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याने सरकारने या सवलतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की ही सवलत बंद करण्यात येणार आहे.त्या मुळे आता महिलाना 50 % सवलतीचा लाभ मिळणार नाही .

एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमासाठी धाराशिव दौऱ्यावर गेले होते. या वेळी पत्रकारांनी महिलांना दिल्या जाणाऱ्या 50% सवलतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, या सवलतीमुळे एसटी महामंडळाला दररोज 3 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवीन कोणत्याही प्रवर्गाला एसटी प्रवासात सवलत देण्यात येणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे वाचा : लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे कडून दिलासा; म्हणाले योजना
एसटी सवलतींवर पुनर्विचार?
ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी महिलांसाठी 50% आणि 75 वर्षांवरील नागरिकांसाठी एसटी प्रवासात सवलत लागू केली होती. मात्र, या सवलतींमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात मंत्री सरनाईक म्हणाले (Pratap Sarnaik) की, “जर सातत्याने सवलती देत राहिलो, तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल. त्यामुळे नवीन सवलती देण्याचा कोणताही विचार करता येणार नाही.” त्यामुळे एसटी महामंडळाच्या सध्याच्या तुटीचा विचार करता, यापुढे नवीन सवलती मिळण्याची शक्यता कमी आहे.
महिलांच्या प्रवासावर परिणाम होणार?
परिवहन मंत्री सरनाईक यांनी केलेल्या या घोषणेमुळे महिलांच्या एसटी प्रवासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने महिला या सवलतीचा लाभ घेत होत्या. मात्र, भविष्यात त्यांना पूर्ण तिकीट भरणे भाग पडणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
हॉस्पिटल प्रकल्पाची पाहणी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त धाराशिव दौऱ्यावर आले होते सरनाईक यांनी तुळजापुरातील मोफत हॉस्पिटल प्रकल्पाची पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) त्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांसाठी हे हॉस्पिटल महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
सरकारचा पुढील निर्णय महत्त्वाचा
सध्या या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. महिलांना एसटी प्रवासात सवलत कायम ठेवावी की नाही, याबाबत पुढील काळात राज्य सरकार काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Pratap Sarnaik
1 thought on “Pratap Sarnaik :महिलांना 50% सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात; राज्य सरकारचा मोठा निर्णय”