Electric Tractor :महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना होणार याचा फायदा!

Electric Tractor : राज्य सरकारने आपले इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या इलेक्ट्रिक वाहनाचा उपयोग करणे अत्यंत सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Electric Tractor

इलेक्ट्रिक (Electric Tractor) वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील प्रदूषण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते. पण मात्र सुरुवातीला या धोरणात शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) , पावर टिलर आणि कटर चा समावेश नव्हता. यावर विचार करण्यात आला आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनाचा समावेश धोरणात केला आहे. आणि यासंबंधीच्या शासन निर्णयाचे शुद्धिपत्रक 27 फेब्रुवारी रोजी काढण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : SBI अमृत कलश योजना 2025 : या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि अटी काय आहेत, अर्ज कसा करायचा पहा सविस्तर!

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर व कटरचा शेतकऱ्यांसाठी फायदे काय?

  • शेतकऱ्यांनी जर शेतीसाठी इलेक्ट्रिक (Electric Tractor) मानाचा वापर केला तर शेतकऱ्यांना इंधनावरील खर्च कमी होईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभावही कमी होण्यास मदत होईल.
  • या वातावरणातील वायु प्रदूषणात घट होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या देखील फायदा होईल.
  • तसेच इतर वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने जास्त वेळ चालतात, देखभाल खर्च कमी होतो आणि कमी इंधनाची आवश्यकता भासते.
  • महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार, नागरिकांना बॅटरी वरील वाहन खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे.
  • या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना जेव्हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर आणि कटर खरेदी करतील त्यावेळेस होईल. राज्य शासनाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे.
  • शासनाच्या निर्णयामुळे फक्त शेतकऱ्यांनाच फायदा होणार नाही तर, पर्यावरण आणि वातावरणीय बदलाचा प्रभावही कमी होईल.
  • प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक (Electric Tractor) वाहने हे खूप मदत करतील, ज्यामुळे स्वच्छ हवा मिळवता येईल.
  • याशिवाय,ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची आवड निर्माण होईल.
  • या धोरणामुळे महाराष्ट्र राज्य शेतीच्या कामांमध्येही इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि किफायतशीर साधने मिळतील,असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले .Electric Tractor

1 thought on “Electric Tractor :महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना होणार याचा फायदा!”

Leave a comment

Close Visit Batmya360