Agriculture Land : सातबारा उताऱ्यावर नमूद असलेली भूधारणा पद्धती शेतकरी व जमीनधारकांसाठी महत्त्वाची असते. मात्र, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनींबाबत अनेकांना संभ्रम असतो. या लेखात आपण भूधारणा प्रकार, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनींचे स्वरूप, तसेच काही जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येतात का? याची सविस्तर माहिती पाहूया. Agriculture Land

राज्यातील भूधारणा प्रकार
महाराष्ट्रात (Agriculture Land) भूधारणा पद्धती चार प्रमुख गटांत विभागल्या जातात:
- भोगवटादार वर्ग-1 पद्धत
या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, त्या जमिनींवर कोणतेही सरकारी निर्बंध नसतात. कारण की, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो त्यामुळे तो त्याच्या स्वेच्छेने विक्री करू शकतो. - भोगवटादार वर्ग-2 पद्धत
या जमिनींवर सरकारी नियंत्रण असते. मालकाने जर ही जमीन हस्तांतरित करायची असेल, तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. या जमिनींना “प्रतिबंधित” किंवा “नियंत्रित” जमिनी असेही संबोधले जाते. - शासकीय पट्टेदार जमीन
ही जमीन सरकारच्या मालकीची असून, ती विशिष्ट कालावधीसाठी म्हणजेच 10, 30, 50 किंवा 99 वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिली जाते. - महाराष्ट्र शासनाची जमीन
चौथ्या प्रकारच्या ‘ जमिनी पूर्ण पणे सरकारी मालकीच्या असतात. शासन विविध प्रकल्पांसाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी या जमिनी राखून ठेवते.
हे वाचा : बियर किंवा दारुचे दुकान चालकांना दणका; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !
भोगवटादार वर्ग-2 मधील 16 प्रकारच्या जमिनी
भोगवटादार वर्ग-2 प्रकारातील जमिनी स्वतंत्रपणे विकता येऊ शकत नाहीत. या जमिनी स्थानिक महसूल प्रशासनाच्या मंजुरीनेच हस्तांतरित करता येतात. या जमिनींची माहिती गाव नमुना 1 (क) मध्ये नोंद असते. खालील 16 प्रकारच्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 मध्ये मोडतात ते पाहूया. Agriculture Land
वर्ग-2 च्या जमिनींचे 16 प्रकार
राज्य सरकारने 17 मार्च 2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार, भोगवटादार वर्ग – 2 जमिनीच्या अधिकृत हस्तारणास कुठेतरी आळा बसावा या दृष्टीने महसूल नियम पुस्तिकेच्या खंड 4 मधील गाव नमुना एक (1) मध्ये सुधारणा केली आहे .यासोबतच सरकारने भोगवटादार वर्ग- 2 च्या जमिनीची एकूण 14 प्रकारांमध्ये वर्गवारी केली आहे .यानंतर 15 मार्च 2021 रोजी शासनाने शासन निर्णयाद्वारे 2 प्रकारच्या जमिनी यामध्ये समाविष्ट केल्या आहेत .Agriculture Land
अशाप्रकारे भोगवटादार वर्ग-2 मध्ये एकूण 16 प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो . तर आपण पाहूया जमिनी कोणकोणते आहेत आणि त्याची नोंद गाव मुन्यात कोठे असते खालील प्रमाणे पाहूया .
- मुंबई कुळ कायदा 1948 अंतर्गत विक्री झालेल्या जमिनी- 1 क (1)
- वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्थान जमिनी वगळून) – 1 क (2)
- शासन योजनांद्वारे भूमीहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी – 1 क (3)
गृह निर्माण संस्था व औद्योगिक अस्थापना, शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प उपयोगासाठी दिलेल्या जमिनी – 1 क (4) - सिलिंग कायदा म्हणजेच महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियम, 1961 अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी – 1 क (5)
- महानगरपालिका व ग्रामपंचायतींना राखीव ठेवलेल्या जमिनी (गुरचरण, सार्वजनिक वापर इत्यादीसाठी)- 1 क (6)
- देवस्थान इनाम जमिनी- 1 क (7)
- आदिवासी खातेदारांच्या जमिनी– 1 क (8)
- पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रदान केलेल्या जमिनी- 1 क (9)
- भाडेपट्टीवर दिलेल्या शासकीय जमिनी- 1 क (10)
- भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी- 1 क (11)
- खाजगी वन संपादन कायद्यानुसार चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी-1 क (12)
- भूमीधारी हक्कांनुसार प्राप्त जमिनी – 1 क (13)
- सिलिंग कायद्यानुसार अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी- 1 क (14).
- भूसंपादन कायद्यानुसार संपादित केलेल्या जमिनी– 1 क (15)
- वक्फ जमिनी – एक क (16)
कोणत्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करता येत नाहीत?
भोगवटादार वर्ग-2 मधील 16 जमिनी आहेत त्यापैकी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करता येत नाहीत. महसूल तज्ज्ञांच्या मते, खालील जमिनी कायमस्वरूपी प्रतिबंधित असतात:
- सिलिंगच्या जमिनी वर्ग-1 करण्याची अजून तरी अंशी कायद्यात तरतूद नाही.
- महापालिका किंवा नगरपरिषदांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी वर्ग-1 मध्ये रुपांतर होत नाही.
- देवस्थान इनाम जमिनी
- आदिवासी खातेदारांच्या जमिनी
- खाजगी वन संपादन कायद्यांतर्गत असलेल्या जमिनी
- जास्तीच्या जमिनींसाठी दिलेली सूट असलेल्या जमिनी
- भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी आणि
- वक्फ जमिनी
निष्कर्ष
भोगवटादार वर्ग-2 अंतर्गत असलेल्या जमिनींचे हस्तांतरण सहजपणे करता येत नाही. शासनाने अशा जमिनींवर विशिष्ट निर्बंध लागू केले आहेत. काही जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येऊ शकते, परंतु अनेक जमिनी कायमस्वरूपी भोगवटादार वर्ग-2 मध्येच राहतात. त्यामुळे अशा जमिनींच्या खरेदी-विक्रीपूर्वी सर्व कायदेशीर अटी तपासून घेणे गरजेचे आहे. Agriculture Land