farmer id card केंद्र शासनाने सुरू केलेली एग्रीस्टक योजना शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र प्रदान करणार आहे. या विशिष्ट ओळखपत्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फायदा होईल. शेतकऱ्यांकडे जर शेतकरी विशिष्ट क्रमांक असेल तरच शेतकऱ्यांना यापुढे शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहेत.
farmer id card या आदेशाची पूर्ण कार्यवाही 15 एप्रिल 2025 पासून राज्यभर राबवण्याची कृषी विभागाला राज्य शासनाने सूचना दिले आहेत. या पुढे कोणत्याही योजनांचा लाभ मिळवायाचा असेल तर शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बंधनकारक आहे. जर आपण अद्याप पर्यन्त विशिष्ट क्रमांक साठी अर्ज सादर केला नसेल तर आपणास लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.
कसे काढावे ओळखपत्र farmer id card
शेतकरी ओळख पत्र काढण्यासाठी शेतकरी पोर्टलवर देखील नोंदणी करू शकतात. त्याशिवाय आपण आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी देखील आपले शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड सातबारा आठ त्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लागते. आपल्या आधाराला मोबाईल नंबर लिंक असणे देखील आवश्यक आहे.
आधार कार्ड सातबारा आठ अ या कागदपत्रासह आपण आपले शेतकरी विशिष्ट क्रमांक मिळवू शकता. अर्ज केल्यानंतर आपली माहिती संबंधित विभागाकडून तपासली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शेतकरी विशिष्ट क्रमांक दिला जाईल.
शेतकरी ओळखपत्राचे फायदे
केंद्र शासनाने सुरू केली ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाला शेतकऱ्यापर्यंत सर्व शासकीय योजनांचा लाभ पुरवणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना पीक नुकसान आपत्ती अनुदान, पिक विमा, हमीभाव, खतेबियाने यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांना सहायता देण्यासाठी हे शेतकरी ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा तसेच अनुदानाचा लाभ देणे सोईस्कर होणार आहे. शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात पाहायला मिळेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करताना या विशिष्ट क्रमांकाच्या माध्यमातून अर्ज करणे अत्यंत सोपे होईल. शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी अर्ज करण्यासाठी विविध कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे विशिष्ट ओळख क्रमांक काढणे आवश्यक आहे.
शेतकरी ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
2 thoughts on “farmer id card: शेतकरी ओळखपत्र असेल तरच मिळणार शासकीय योजनांचा लाभ.”