Gas Subsidy : महिलांसाठी सरकारकडून विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत असतात. अशाच महत्त्वाच्या योजनांपैकी एक योजना म्हणजेच गॅस सिलेंडर सबसिडी (Gas Subsidy). या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला गॅस सिलेंडरवर 300 रुपये पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे.
ज्या महिलांना गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करणे अत्यंत कठीण होते. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना थोडासा का होईना आधार देण्यात येतो. ज्यामुळे घरगुती इंधन म्हणून स्वयंपाक गॅसच्या वापराला चालना मिळते.Gas Subsidy

या योजनेचा फायदा काय?
या योजनेचा फायदा म्हणजेच या सबसिडीचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही मद्वस्त्याची भरती होत नाही किंवा कोणीही मत वस्ती न ठेवता सुरक्षित आणि पारदर्शक व डिजिटल पद्धतीने हा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो . मात्र, काही निकष पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे.
तर यासाठी सर्वप्रथम, गॅसचे कनेक्शन हे लाभार्थी महिलांच्या नावावर असणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच संबंधित बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेली असावे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे,केवायसी पूर्ण झालेली असावी.तसेच मोबाईल नंबर ही आधार व बँक खात्याशी जोडलेला असावा,कारण की सबसिडी जमा झाल्यानंतर तुम्हाला जमा झाली आहे, याची माहिती SMS च्या माध्यमातून ग्राहकाला कळविण्यात येते.
हे वाचा :शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा फार्मर आयडी…. फक्त 30 मिनिटात
योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया देण्यात आलेली आहे. तुम्हाला ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संबंधित गॅस एजन्सी (उदा. HP gas, Bharat gas, Indian) यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ग्राहक आयडीने लॉगिन करून तुम्हाला अर्ज करता येतो.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस वितरण कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा लागतो. आवश्यक लागणारी कागदपत्रे म्हणजेच, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, गॅस कनेक्शन नंबर, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचा समावेश आहे. जर तुम्ही एकदा ही प्रक्रिया केली तर तुम्हाला दर महिन्याला खरेदी केल्यानंतर 300 रुपयाची सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते.Gas Subsidy
तुम्ही सबसिडी जमा झाली की नाही हे कसे तपासाल?
सबसिडी (Gas Subsidy) जमा झाली की नाही हे तपासण्यासाठी ग्राहकांना स्वतः आपल्या गॅस एजन्सीच्या वेबसाईटवर लॉगिन करून सबसिडीचे स्टेटस पाहू शकतात. याशिवाय तुम्हाला बँकेच्या नेट बँकिंगच्या माध्यमातून पण किंवा मोबाईल ॲप द्वारे सुद्धा ही सबसिडी जमा झाल्याची माहिती मिळू शकते.
ही सर्व माहिती तुम्ही वारंवार तपासणी आवश्यक आहे, कारण की अनेक वेळा केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे पण किंवा बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे पण सबसिडी अडकते किंवा रद्द होते. अनेक महिलांना सबसिडीच्या लाभाबद्दल माहिती नसल्यामुळे त्या महिला या लाभापासून वंचित राहत आहे . त्यामुळे महिलांनी या योजनेच्या अर्जामध्ये सविस्तर माहिती, पात्रता, केवायसी प्रक्रिया, बँक खात्याशी आधार लिंक असणे अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे तुम्ही 300 रुपयाच्या गॅस सबसिडी पासून वंचित राहणार नाही.Gas Subsidy