Farmer ID: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा फार्मर आयडी…. फक्त 30 मिनिटात

Farmer ID : शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी न्यूज आहे. शेतकऱ्यांना शासनाने फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे यातच आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने महत्त्वाची सुविधा उपलब्ध केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या स्वतःचा फार्मर आयडी क्रमांक मिळवता येणार आहे. सरकारने ही सुविधा उपलब्ध केल्यामुळे शेतकऱ्यांना आता सीएससी केंद्रावर किंवा कुठेही जाऊन फार्मर आयडी काढण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही, आणि त्यांना त्यांच्या गावशिवारात बसून ही प्रक्रिया करणे शक्य होईल. यासाठी आता तसे सुविधा देणारे संकेतस्थळ सुरू झाले आहे .शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे.Farmer ID

Farmer ID

20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे ओळख क्रमांक नाही

कृषी विभागाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही फिरण्याची गरज राहिली नाही. आता शेतकऱ्यांना घरबसल्य अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळवतात येईल.15 एप्रिलपासून शेतकऱ्यांना कृषी विभागाकडील योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी सीएससी केंद्रात जावे लागत होते. आतापर्यंत 94 लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळाला आहे. आणखी 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडे स्वतःचा ओळख क्रमांक नाही.Farmer ID

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : तुम्हाला सोलर पंप योजनेत मोबाईल नंबर अपडेट चा मेसेज आला आहे का? मंग लवकरच करा हे काम…!

जमिनीचा तपशील एकत्र दिसणार

शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळवण्यासाठी आधी स्वतःचा आधार क्रमांक व बँक खात्याशी संलग्र असलेला मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा लागेल .ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकृत https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे सोपे होईल .

  • शेतकऱ्यांना या https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ संकेतस्थळावर गेल्यानंतर आधी रखण्यामध्ये मोबाईल क्रमांक टाकावा लागेल .
  • मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी येईल .ओटीपी व कॅप्चा भरताच क्रिएट न्यू अकाउंट येथे क्लिक करावे लागेल .
  • त्यानंतर तेथे शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल .
  • आधार क्रमांक टाकतात परत एकदा ओटीपी येईल आणि वैधता पूर्ण होईल .
  • ही प्रक्रिया होताच या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना स्वतःच्या नावे कोटी जमीन आहे ते दिसून लागेल .
  • त्यानंतर तुम्हाला जमिनीच्या चौकटीसमोर क्लिक करावे लागेल .
  • जर तुमच्या जमिनीचा तपशील आपोआप न आल्यास तुम्हाला सातबारा वरील गट क्रमांक टाकावा लागेल म्हणजेच लगेच तपशील येईल .
  • यावर क्लिक करतात तपशील दिसेल .

3 प्रकारच्या मान्यता बंधनकारक

संकेतस्थळावर माहिती भरताच जमिनीचा तपशील आल्यानंतर शेतकऱ्यांना तीन प्रकारच्या मान्यता ( कसेन्ट) देणे बंधनकारक आहे.

  • माझा सात-बारा उताऱ्याच्या माहितीला जोडावा .
  • लाभ मिळवण्यासाठी ही माहिती वापरावी
  • तसेच दिलेली माहिती कर आहे

अशा तीन मान्यता असतील.या मान्यता शेतकऱ्यांनी स्वीकारल्या कि,लगेच पुन्हा ओटीपी येईल .हा ओटीपी टाकतात पुढे रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली असा मेसेज संबंधित शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर येईल .अशाप्रकारे नोंदणी प्रक्रियेचे काम पूर्ण होईल .

अर्धा तासात मिळणार शेतकरी क्रमांक

शेतकऱ्यांना अर्ध्या तासात मिळणार शेतकरी ओळख क्रमांक . संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर ते रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर अर्ध्या तासाने मोबाईल वर पीडीएफ फाईल मिळते. यामध्ये शेतकऱ्यांचा सर्व तपशील असतो आणि एक एनरोलमेंट नंबर देखील दिसतो .हा नंबर म्हणजे शेतकऱ्यांचा ओळख क्रमांक असेल . इथून पुढे शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी ह्या एकाच क्रमांकाने ओळखला जाणार आहे .तसेच,शेतकऱ्यांना सरकारी मदत,अनुदान किंवा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हा क्रमांक कायमस्वरूपी लागणार आहे .म्हणजेच,शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच यापुढे शेतकरी ओळख क्रमांक महत्त्वाचा असेल. Farmer ID

2 thoughts on “Farmer ID: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा फार्मर आयडी…. फक्त 30 मिनिटात”

Leave a comment

Close VISIT MN CORNERS