Gold Price Update : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, किमती आणखी कमी होतील का?

Gold Price Update दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दारामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. परंतु सध्या अचानक सोन्याच्या दरामध्ये पाच हजार रुपये प्रति तोळा या प्रमाणात किमतीची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रति तोळा एक लाख रुपये दर गाठले होते. या सोन्याच्या दरामध्ये आता 5000 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

का कमी झाले सोन्याचे दर Gold Price Update

मागील अनेक दिवसापासून अमेरिकन डॉलरच्या दरामध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार तणाव कमी झाल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत. सोन्याच्या दराचा उच्चं की किमती पसून सोन्याचे दर पाच हजार रुपये प्रति तोळा या प्रमाणात कमी झाले आहेत. स्थानिक बाजारासोबत आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये देखील सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Gold Price Update आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होणाऱ्या हालचाली व्यापार आणि देशांमधील तणाव या सर्व बाबीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये नेहमीच बदल होतो. बाजारातील संबंध आणि व्यवहार सुरळीत सुरू असल्यास सोन्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये अधिक गुंतवणूक केली जाते. सोन्याची गुंतवणूक अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील संबंध आणि व्यवहार यामध्ये अडचणी निर्माण होण्याचे चिन्ह असतात अशावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक अधिक वाढवली जाते. गुंतवणूक वाढवल्यामुळे आपोआपच सोन्याच्या किमतीमध्ये देखील वाढ होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

परंतु सध्या चीन आणि अमेरिका या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार करणाऱ्या देशांमध्ये व्यावहारिक संबंध व्यवस्थित नसल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. एका दिवसात दहा ग्रॅम सोन्या मागे जवळपास 5000 रुपये एवढी किंमत कमी झाली आहे.

सोन्याच्या दराबाबत पुढील अपडेट

सीएनबीसी कडून दिलेल्या माहितीनुसार सोने खान कंपनीच्या सीईओने असा दावा केला आहे की, पुढे काही काळामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठे घसरण पाहायला मिळेल. त्यांनी सांगितले की पुढील एक वर्षांमध्ये सोन्याच्या दरात घसरण होऊन सोन्याचे दर 1800 ते 1900 डॉलर च्या आसपास येतील अशी शक्यता वर्तवली आहे.

कझाकिस्तानच्या सॉलिडकोर रिसोर्सेज या सोन्याच्या खाणीच्या कंपनीच्या सीईओ यांच्या अंदाजा नुसार पुढील काही काळात सोन्याच्या किमती कमी होतील असा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार पुढील वर्षभरात सोन्याच्या किमती कमी होतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

खरंच किमती कमी होतील का?

सोन्याच्या किमती कमी होतील अशी माहिती कझाकिस्तानच्या सॉलिडकोर रिसोर्सेज या कंपनीच्या सीओने दिली आहे. परंतु खरंच त्यांच्या म्हणण्नुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या किमती कमी होतील का? असा प्रश्न सर्वांचेच मनात निर्माण झाला आहे. या प्रश्नाबाबत अधिक बाजार विश्लेषक व आंतरराष्ट्रीय बाजार भाव अभ्यासक यांच्याशी चर्चा केली असता. त्यांच्याकडून पुढील काही काळात सोन्याच्या किमती नक्कीच कमी होतील परंतु एवढ्या कमी होणार नाहीत. साधारणपणे आजच्या स्थितीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये फक्त दहा ते पंधरा टक्के एवढीच घसरण होऊ शकते. अशी माहिती काही बाजार तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय बाजार अभ्यासक यांनी दिली आहे.

Gold Price Update टीप: दिलेली माहिती आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असणाऱ्या स्थितीनुसार आणि रिपोर्टनुसार दिलेली आहे. या माहितीशी लेखक यांची सहमती असेलच असे नाही. ही माहिती आपल्याला फक्त आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचे ज्ञान पोहोचवण्यासाठी देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी आपण योग्य सल्ला आणि माहिती घेऊनच गुंतवणूक करावी. Gold Price Update

Leave a comment

Close VISIT MN CORNERS