PM E-Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना …आता फक्त 5 दिवसात मिळणार अनुदान! असा करा अर्ज…

PM E-Drive Scheme : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना(EVS )प्रोत्साहन देण्यासाठी पीए इ ड्राइव्ह योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनुदान दिले जाणार आहे. या मागचे उद्दिष्ट म्हणजे प्रदूषण कमी करणे आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करणे,तसेच देशातील विद्युत गतिशीलतेला प्रोत्साहन करणे चे या योजनेमागचे उद्दिष्ट आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आता तुम्हाला यापुढे रस्त्यावर वाढलेली दिसेल .आता यातच सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे .सध्या सरकारने या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदानाची प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे .या पूर्वी ईव्ही अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 40 दिवसाचा कालावधी लागत होता मात्र, आता फक्त 5 दिवसांतया या योजनेचा लाभ मिळणार आहे.PM E-Drive Scheme

PM E-Drive Scheme

काय आहे पीएम ई-ड्राइव्ह योजना?

केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 सप्टेंबर 2024 रोजी ही योजना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, ही योजना एक ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यात आली आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे .10,900 कोटी रुपयांच्या बजेटची ही योजना मुख्यतः इलेक्ट्रिक दुचाकी,तीन चाकी वाहने,बस,ट्रक आणि रुग्णवाहिका यासारख्या वाहनांना अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. 24.79 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3.16 लाख 3 चाकी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत .PM E-Drive Scheme

हे वाचा : राज्यातील प्रत्येकाला घर मिळणार! केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता…मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान किती?

पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत,इच्छुक असणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीदारांना पहिल्या वर्षी 10,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 5,000 रूपयांपर्यंत अनुदान देण्यात येते .या योजनेअंतर्गत ओला, एथर, टीव्हीएस आणि बजाज चेतक यासारखे लोकप्रिय ब्रँड येतात .PM E-Drive Scheme

इलेक्ट्रिक दुचाकी वाहन अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन खरेदीदारांना सर्वप्रथम ई-ड्राइव्हा पोर्टलवर जा आणि ई- व्हाउचरसाठी अर्ज करा .आता पात्र ईव्ही खरेदी करा आणि त्यानंतर ई- व्हाउचरवर सही करा . तसेच या सोबतच, डीलरसोबत पोर्टलवर ई- व्हाउचर अपलोड करा .जर तुम्हाला या सर्व गोष्टी खूप अवघड वाटत असतील तर तुमची दुचाकी डीलरही या सर्व गोष्टी करून घेतो .त्यामुळे तुम्हाला जास्त काही काळजी करण्याची गरज नाही .PM E-Drive Scheme

Leave a comment

Close VISIT MN CORNERS