hsc result 2025 बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर: येथे पाहता येणार निकाल.

maharashtra hsc result 2025 : बारावीच्या 2025 च्या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पूर्ण झाल्या होत्या. या परीक्षा लवकर घेण्यात आल्यामुळे निकाल देखील लवकरच लावले जातील अशी माहिती समोर आली होती. बोर्डाकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बारावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आता बारावीचे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. निकालाबाबत स्पष्टता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे.

कधी होणार निकाल जाहीर

महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल दिनांक पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. प्रत्येक वर्षी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करते. त्यानुसारच यावर्षी देखील ऑनलाइन पद्धतीनेच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

निकाल कोठे पाहता येईल maharashtra hsc result 2025

दिनांक पाच मे 2025 रोजी 2025 मधील बारावी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिद्ध होणार आहे. हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्यामुळे पालकांना तेच विद्यार्थ्यांना हा निकाल पाहण्यासाठी काही संकेतस्थळे देण्यात आलेले आहेत. खाली दिलेल्या कोणत्याही एका संकेतस्थळावर जाऊन आपण आपला बारावीचा निकाल पाहू शकाल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

hsc result 2025 निकाल कसा पाहावा

  • बारावीचे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी वरीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • या पेजवर तुम्हाला तुमचा रोल नंबर विचारला जाईल तो भरा.
  • रोल नंबर भरल्यानंतर तुमच्या आईचे नाव विचारले जाईल ते भरा.
  • आईचे नाव भरल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्यासमोर आपला निकाल दिसून येईल.
  • यां निकालाची आपण पीडीएफ सेव करू शकता किंवा प्रिंट देखील मिळवू शकता.

Leave a comment