MahaDBT Apply Online : राज्य शासनाचा आपले सरकार महाडीबीटी हा उपक्रम राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी राबविण्यात येत आहे .या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कृषी यंत्रसामग्री, सिंचन सुविधा, फलोउत्पादन, संरक्षित शेती यासारख्या विविध योजनांसाठी अनुदान उपलब्ध करून दिली जाते .MahaDBT Apply Online

या पोर्टलची वैशिष्ट्ये
राज्य शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर शेतकऱ्यांना कुठूनही आणि कधीही अर्ज करता येतो .तसेच,अर्ज केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना अर्जाची स्थिती याच पोर्टलवर तपासता येते .ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12, 8 अ उतारे, आधार संलग्न बँक खात्याचे पासबुक ,खरेदीची पावती इत्यादी अपलोड करता येतात.
अर्ज प्रक्रिया दरम्यान शेतकऱ्यांना एसएमएस आणि ई-मेल अलर्ट मिळतात .या योजनेअंतर्गत सर्व फायदे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येतात .महाडीबीटी पोर्टल वर अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन पद्धतीने आहे. MahaDBT Apply Online
हे वाचा : राज्य सरकारकडून आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी आणि करात सूट, काय आहे नवे EV धोरण?
महाडीबीटी पोर्टल वर वर ऑनलाईन अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांनी अर्ज करण्या अगोदर महाडीबीटीपोर्टल वरील मार्गदर्शक पुस्तिका वाचावी .अर्जदार शेतकऱ्यांना कोणत्याही योजनाचे पात्रता आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे .जर तुम्ही कोणतेही टप्प्यावर पात्रता अयोग्य आढळून आल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो यामुळे शहानिशा करून पात्रता आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे .शेतकऱ्यांचे अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत MahaDBT Apply Online
महाडीबीटी या पोर्टल वरील महत्वाच्या योजना आणि अनुदान
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना(ती बघ व तुषार सिंचन):या योजनेसाठी 45 टक्के ते 55% अनुदान
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान/राज्य पुरस्कृत योजना:ट्रॅक्टर,अवजारे- यासाठी 40% ते 60 टक्के अनुदान
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान(कडधान्य, गळीत धान्य, कापूस) या योजनेसाठी बियाणे व यंत्रे- 50% अनुदान
- राष्ट्रीय कृषी विकास योजना: यांत्रिकीकरण, संरक्षित शेती- 40% ते 60% अनुदान
- मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना: ठिबक व तुषार सिंचन- 25% ते 30 टक्के अनुदान
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान: शेडनेट, पॉलिहाऊस, पॅक हाऊस- 50% अनुदान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: संत्रा, मोसंबी, आंबा- शंभर टक्के अनुदान
अर्ज केल्यानंतर अर्ज निवड होण्याची प्रक्रिया
MahaDBT या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र अर्जाची निवड पारदर्शक लॉटरी प्रणाली द्वारे होते .लॉटरी निवड झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे पात्र शेतकऱ्यांना पोर्टलवर अपलोड करावी लागतात .हे कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर कृषी विभागामार्फत या कागदपत्राची छाननी केली जाते छाननी करून 10दिवसात पूर्वसंमती पत्र दिले जातंपूर्वसंमती नंतर तीस दिवसात खरेदी करून देयके पोर्टलवर अपलोड करावी लागतात .यानंतर तपासणी होते आणि पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तुम्ही केलेल्या अर्जाचे अनुदान जमा केलं जातं .MahaDBT Apply Online