Mahadbt Farmer Schemes : राज्य शासनाने आपले सरकार महाडीबीटी उपक्रम हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक चांगला आणि पारदर्शक डिजिटल पर्याय ठरला आहे. शेतकऱ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध कृषी योजनांचा लाभ मिळतो. पारंपरिक पद्धतीतील वेळ आणि कागदपत्राची कटकट टाळत, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सोय या प्रणालीत उपलब्ध आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणाली व आधारित हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे.Mahadbt Farmer Schemes

महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करण्याची प्रक्रिया
महाडीबीटी या पोर्टलचे अधिकृत संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in हे आहे. या संकेतस्थळावर इच्छुक असणारी शेतकरी आपण नोंदणी करून वेगवेगळ्या योजनेचा अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील. यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार कार्ड, जमिनीचा 7/12 , 8 अ चा उतारा,बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, मोबाईल नंबर आणि जर शेतकरी हा कृषी यंत्र खरेदी करत असेल, तर त्याची कोटेशन आवश्यक आहे .हे सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात .कर्जाची स्थिती तसेच मंजुरी आणि लॉटरी चा निकाल इत्यादी सर्व काही माहिती अर्ज करणारे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस किंवा ईमेल द्वारे मिळते,त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहते .Mahadbt Farmer Schemes
हे वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ई-ट्रॅक्टर खरेदी करा बिनव्याजी कर्जावर आणि मिळवा 1.5 लाखापर्यंत अनुदान
महाडीबीटी पोर्टल वरील काही प्रमुख योजना
या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना देण्यात आले आहेत,त्याचा लाभ घेऊन राजस्थानी शेतकरी आपली शेती अधिक समृद्ध आणि आधुनिक बनवू शकतात .तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरील काही प्रमुख योजनांची खाली माहिती दिली आहे .
- कृषी यांत्रिकीकरण योजना : या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर,नांगर, पेरणी यंत्र थ्रेशर यासारख्या कृषी उपकरणाच्या खरेदीवर 40% ते 60 टक्के पर्यंत आर्थिक मदत दिली जाते .
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी 45% ते 55 टक्के अनुदान दिले जाते .
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान : या योजनेअंतर्गत कडधान्ये, गळती धान्य आणि तेलबिया यासाठी बियाणी व यंत्रासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : या योजनेत शेतकऱ्यांना आंबा, संत्री, मोसंबी यासारख्या फळबागाची लागवड करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते.
अर्ज निवड प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
महाडीबीटी टोटल वर्क सर्व योजनेच्या अर्जाची निवड ही संगणकीकृत डॉक्टर पद्धतीने केली जाते .लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना दहा दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असते . त्यानंतर कागदपत्राची पडताळणी कृषी विभागाच्या मार्फत करून दहा दिवसाच्या आत पूर्वसंमती पत्र दिले जाते .शेतकऱ्यांना हे पत्र मिळाल्यानंतर 30 दिवसात संबंधित यंत्र किंवा साहित्य खरेदी करून त्याची पोच पावती, बिले,फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे परत नंतर पोर्टलवर अपलोड करावी लागतात.अंतिम पडताळणी नंतर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाते .Mahadbt Farmer Schemes
अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज भरताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. जसे की,फोटोवरील नियोजन यांच्या पात्रता आणि संपूर्ण वाचूनच अर्ज करावा, अचूक माहिती भरावी, शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे स्पष्ट आणि पूर्ण असावीत .जर तुम्ही अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली असेल तर तुमचा रद्द केला जाऊ शकतो .
महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त आर्थिकच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यास देखील मदत होते .शेतकऱ्यांना ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होणार आहे,तर यांत्रिकीकरणामुळे मजुरी वरील खर्च कमी होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.Mahadbt Farmer Schemes