kharif pik vima: मागील चार दिवसांमध्ये राज्यात किती शेतकऱ्यांनी नोंदवले पीक विमासाठी नाव ?

kharif pik vima ; एक रुपयात खरीप पिक विमा योजना बंद झाल्यानंतर यंदापासून शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांनी ठरवलेला हप्ता भरून प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे . मागील चार दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 64 हजार ४४६ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, 40 हजार 650 हेक्टरहून अधिक पिकांचे विमा संरक्षण करण्यात आले आहे, तर या विमा संरक्षणा द्वारे 218 कोटी रुपयांची रक्कम संरक्षित झाली आहे .

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 3 कोटी 85 लाख रुपयांचा विमा हप्ता भरला आहे .विशेष म्हणजे, विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही नांदेड जिल्ह्यातील आहे, नांदेड जिल्ह्यातील 8 हजार 563 शेतकऱ्यांनी पिक विमा घेतलेला आहे .kharif pik vima

kharif pik vima

एक रुपयात पिक विमा योजना बंद,पुन्हा मूळ स्वरूपात सुरुवात

मागील तीन वर्षापासून राज्य सरकारने शेतकऱ्यांना फक्त एक रुपया पिक विमा योजना सुरू करून दिली होती .या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला,परंतु काही ठिकाणी होणारे गैरप्रकार आणि शासनाला आलेला मोठा तोटा लक्षात घेता, ही योजना पुन्हा एकदा तिच्या मूळ स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी निश्चित केलेला विमा हत्या भरावा लागणार आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

शेतकऱ्यांनी भरला तीन कोटी 85 लाखाचा विमा हप्ता

पिकनिहाय विमा हप्ता निश्चित करण्यात आल्यामुळे,या 64 हजार शेतकऱ्यांनी 3 कोटी 85 लाख रुपयाचा विमा हप्ता राज्य सरकारकडे जमा केला आहे . या शेतकऱ्यांच्या विमा संरक्षणासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येकी 7 कोटी 18 लाख रुपये देणार आहे .kharif pik vima

पिक विमा संरक्षण घेतलेल्या सर्वाधिक शेतकऱ्यांची नोंद?

या योजनेमध्ये सर्वाधिक 25 हजार 398 लातूर विभागातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे .तर,एकाच जिल्ह्यातील विचार केला तर नांदेड जिल्हा आघाडीवर आहे ,या जिल्ह्यातील 8 हजार 563 शेतकऱ्यांनी आपल्या पिक विम्याचे संरक्षण केले आहे .तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात फक्त 5 शेतकऱ्यांनी या योजनेचा सहभाग घेतला आहे,जो कोकण विभागातील सर्वात कमी आकडा आहे.kharif pik vima

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

Leave a comment