पशूसंवर्धन नावीन्यपूर्ण योजना अंतिम निवड यादी लांबणीवर.. pashusavardhan yojana list

pashusavardhan yojana list : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केली नाविन्यपूर्ण योजना. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुधनांचा वाटप केले जाते. यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुधन प्राप्त करण्यासाठी शासनाकडून अनुदान वितरित केले जाते. यासाठी अनेक पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज देखील सादर केले होते. त्यानंतर या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्याच्या एसएमएस प्राप्त झाले होते. कागदपत्र अपलोड केल्यानंतर या कागदपत्राची तपासणी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्रुटी मधील कागदपत्रे परत अपलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात आले. वेळापत्रकानुसार 13 जुलै 2025 रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल असे सांगण्यात आलेले होते.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार

pashusavardhan yojana list पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेच्या वेळापत्रकानुसार 13 जुलै 2025 रोजी अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु 13 जुलै रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले. याबाबत पोर्टलवर देखील नवीन अपडेट देण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अंतिम निवड यादी साठी प्रतीक्षा pashusavardhan yojana list

संकेतस्थळावर नवीन सूचना जोडण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टारगेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत अशी सूचना जोडण्यात आली आहे. अंतिम पात्रता यादी लवकरच प्रसिद्ध होईल याबाबतचे अपडेट देखील आपल्याला कळवले जाईल. अशी सूचना पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने आता सध्या तरी अंतिम यादी प्रसिद्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टार्गेट उपलब्ध नाही

शासनाकडून या अंतिम यादीसाठी टार्गेट उपलब्ध नसल्याचे कारण समोर करण्यात आले आहे. टारगेट उपलब्ध नसल्यामुळे अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणार आहे. याबाबत पोर्टलवर किंवा सरकारकडून कोणतीही निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देखील शेतकऱ्यांना आता अंतिम निवड यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. योजना राबवण्यापूर्वीच शासनाने बाकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. आता शेवटच्या क्षणी टारगेट उपलब्ध नसणे हे कारण देऊन शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण केली आहे.

pashusavardhan yojana list पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेल्या सूचनांच्या माध्यमातून लवकरच याद्या प्रसिद्ध केल्या जातील असे सांगितले आहे. यानुसार विभागाकडून पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर निवड याद्या प्रसिद्ध करण्यात याव्या अशी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे.

Leave a comment