Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे डोकेदुखी वाढवणारी बातमी! 21 हजार महिलांचे अर्ज रद्द, तुमचं नाव आहे का?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी यवतमाळ मधील 27 हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील 21 हजार 937 महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

21 हजार महिलांचे अर्ज रद्द

अमरावती जिल्ह्यात एकूण 21 937 महिलांचे अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 47 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडला आहे .तर सध्या अमरावतीमध्ये 6 लाख 95 हजार 350 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत . मात्र आता मोठ्या संख्येने अर्ज बाद झाली आहेत त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत ,त्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही,हे स्पष्ट झाले आहे.Ladki Bahin Yojana

आता अर्ज नोंदणी बंद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सर्व पात्रता आणि निकषांमध्ये बसत असणाऱ्या महिलांना अर्ज करता येणार नाही .ज्या महिलांनी या पूर्वी अर्ज केले आहेत त्या महिलांच्या अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येत आहे .याच प्रक्रियेमध्ये आता अमरावती जिल्ह्यातील 21 हजाराहून अधिक महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत .Ladki Bahin Yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कुणाला मिळणार नाही लागत?

ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या निकषा बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे .त्या महिलांना या योजनेतून रद्द करण्यात आले आहे .याच कारणामुळे अमरावती मधील 21हजार महिलांचे अर्ज बाद केले आहेत.महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त .ज्या महिलांकडे चार चाकी वाहन, तसेच ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेता आहेत .अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत .जर तुम्ही या योजनेचा लाभ निकषा बाहेर जाऊन घेतला असेल तर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही . Ladki Bahin Yojana

जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

आता अनेक लाडक्या बहिणी जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत .वारंवार जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे असा प्रश्न महिलांकडून विचारण्यात येत आहे .दरम्यान, जुलै महिन्याचा हप्ता हा पुढच्या दोन आठवड्यामध्ये यायला पाहिजे .परंतु याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही .मात्र, लवकरच माहिती दिली जाऊ शकते .ज्यावेळेस माहिती सांगितली जाईल तेव्हा आमच्याकडून नक्कीच तुम्हाला सांगण्यात येईल .Ladki Bahin Yojana

Leave a comment