PM Kisan : देशभरातील कोट्यावधी शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक दिवसांपासून शेतकरी 2000 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खात्यावरून शेतकऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी आता अनोळखी लिंक , कॉल आणि मेसेज यापासून सावध राहावं, असे आवाहन शासनाकडून करण्या आले आहे .
शेतकऱ्यांनी आता अधिकृत माहितीसाठी फक्त पीएम किसान सन्मान निधी ची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ आणि अधिकृत एक्स(ट्विटर)खाते याच माध्यमावर विश्वास ठेवा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे .PM Kisan

काय आहे सरकारचे शेतकऱ्यांसाठी आवाहन
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना सोशल मीडियावर पीएम किसान योजनेच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहिती पासून सावध राहण्यास सांगितले आहे . फक्त https://pmkisan.gov.in/ आणि @pmkisanpffical या वरून मिळणाऱ्या अपडेट वर विश्वास ठेवावा. बनावट लिंक, कॉल आणि मेसेज पासून दूर राहा, असे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी फक्त पीएम किसान सन्मान निधीच्या अपडेट्स अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @pmkisanpfficial वरून घ्याव्यात असे देखील आवाहान करण्यात आले आहे.
आता देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी दिला जाणार याकडे पात्र सर्व शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे .या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात .या योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी पाठवण्यात आली होती .आता शेतकऱ्यांना विश्वास त्याची प्रतीक्षा आहे .
यापूर्वी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांना देण्यात आली होती . महाराष्ट्र राज्यातील 9325774 लाभार्थ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली होती .PM Kisan
महाराष्ट्र मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात .यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या दोन्ही योजना मधून वर्षाला एकूण 12 हजार रुपये मदत मिळते .महाराष्ट्रातील शेतकरी हे सध्या नमो शेतकरी महास्मान निधी योजनेच्या पुढील हत्याची वाट पाहत आहेत . अजून तरी केंद्र शासनाकडून पी एम किसान च्या 20 व्या त्याबद्दल कोणतीही माहिती सांगण्यात आलेली नाही .PM Kisan