Manikrao Kokate : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ऑनलाइन रमी गेम प्रकरणामुळे महाराष्ट्रभर सुरू असलेल्या वादळाचा अखेर शेवट होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत राज्यभर आंदोलने केली होती. या वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, माणिकराव कोकाटे यांच्याकडील महत्त्वाचे कृषी खातं काढून घेतले आहे, आणि त्यांना अन्य खात्याची जबाबदारी दिली आहे.Manikrao Kokate

कृषी खातं काढून घेण्यामागचं कारण
माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर, त्यांची कृती राज्याच्या शेतकरी, तसेच सामान्य जनतेच्या भावना दुखावणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पावसाळी अधिवेशनही याच मुद्द्यावरून अनेकदा थांबले. सरकारने सुरुवातीला यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नसली, तरी जनतेचा आणि विरोधकांचा वाढता दबाव पाहता, हा निर्णय घेणे सरकारसाठी अपरिहार्य बनले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्यावर असा आरोप होणे, हे सरकारची प्रतिमा मलिन करणारे ठरत होते. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव होता.Manikrao Kokate
नेमका निर्णय काय घेतला जणार?
गेल्या काही दिवसांपासून (Manikrao Kokate) कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी राज्यभर विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलने केली. जनतेचा आणि विरोधकांचा पवित्रा पाहता, आता माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेतले आहे. त्यांच्या खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाईल. मात्र, थेट राजीनामा न घेता खातेबदल करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुनील तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेण्यात आला .थेट राजीनामा घेतल्यास सरकार आणि पक्षाची प्रतिमा अधिक खराब होईल या भीतीमुळे त्यांच्यावर अन्य खात्याची जबाबदारी सोपवली जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. महायुती सरकारमधील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यावर अशी कारवाई होत असल्याने पक्षातील नेत्यांमध्येही चिंतेचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
कोकाटेंना कोणती नवी जबाबदारी मिळणार?
काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खातं काढून घेतले आहे आणि या नंतर माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्याकडे आता ‘क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ’ हे विभाग खातं सोपवण्यात आले आहेत.माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता युवा कल्याण, क्रीडा आणि अल्पसंख्याक समाजाच्या विकासाची जबाबदारी असणार आहे.
‘कृषी’ विभागाची जबाबदारी आता कोणाकडे ?
दत्तात्रय विठोबा यांच्याकडे यापूर्वी क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ’ हे विभाग होते. आता त्यांच्याकडे ‘कृषी’ विभाग सोपवण्यात आला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या कृषी विभागाची जबाबदारी श्री. भरणे यांना मिळाल्यामुळे शेतकरी आणि कृषी संबंधित धोरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि कृषी क्षेत्रातील प्रगती यावर त्यांना लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळणार आहे. कृषी क्षेत्रातील आव्हानांचा सामना करत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे.
विरोधकांची पुढील भूमिका काय?
सरकारने माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा राजीनामा न घेता केवळ खातेबदल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता विरोधकांची पुढील भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रमी प्रकरणात थेट मंत्र्यानेच सभागृहात असा गैरवापर केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी विरोधकांची मागणी होती. त्यामुळे, आता खातेबदल झाल्यावरही विरोधक आपला दबाव कायम ठेवतात की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईल. सरकारचा हा निर्णय विरोधकांना शांत करण्यासाठी पुरेसा असेल की नाही, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.Manikrao Kokate