Livestock Farming :राज्य सरकारने राज्यातील पशुपालकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पशुपालन व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे 60 लाख पशुपालक कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे. यापुढे पशुपालकांना कृषी दराने वीज, कमी व्याजदरात कर्ज आणि ग्रामपंचायत करात सवलत मिळणार आहे.
हा निर्णय पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे, तसेच राज्याच्या सकल उत्पन्नात (Gross State Domestic Product) पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवणे हे देखील यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. नीती आयोगाने 2021 च्या अहवालात केलेल्या शिफारसींनुसार, पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.Livestock Farming

नवीन निर्णयाचे प्रमुख फायदे:
- वीज दरात सवलत: पशुपालकांना आता कृषी दराने वीज आकारणी केली जाईल, ज्यामुळे त्यांचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
- सौरऊर्जेसाठी अनुदान: सौर ऊर्जा पंप आणि इतर सौर ऊर्जा संच उभारण्यासाठी अनुदान आणि सवलती दिल्या जातील. यामुळे विजेवरील अवलंबित्व कमी होईल.
- ग्रामपंचायत करात सवलत: कृषी व्यवसायाप्रमाणेच पशुपालनासाठी ग्रामपंचायत कर आकारला जाईल, ज्यामुळे कराचा भार हलका होईल.
- कर्जावरील व्याजदरात सवलत: पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर, पशुपालकांना घेतलेल्या कर्जावर 4% पर्यंत व्याजदरात सवलत मिळेल.
या निर्णयामुळे पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढेल, ज्यामुळे पशुजन्य उत्पादनात वाढ होईल. यासोबतच, व्यावसायिक नफ्यात वाढ होऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल.Livestock Farming
कोणाला मिळेल लाभ?
राज्य सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निश्चित केली आहे. खालील प्रमाणात पशुधन असलेल्या पशुपालकांना या सवलतींचा लाभ घेता येईल:
- 20 हजारांपर्यंत मांसल कुक्कुट पक्षी किंवा 50 हजारांपर्यंत अंड्यांवरील कुक्कुट पक्षी असलेले युनिट्स.
- 45 हजारांपर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिट्स.
- 100 पर्यंत दुधाळ जनावरांचा गोठा.
- 500 पर्यंत मेंढ्या किंवा शेळ्यांचा गोठा.
- 200 पर्यंत वराह (डुक्कर) पालन व्यवसाय.
राज्यात सध्या 1 कोटी 95 लाख 95 हजार पशुधन आहे, आणि सुमारे 60 लाख कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. यामुळे पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर होईल, अशी अपेक्षा आहे.Livestock Farming