एकाच कुटुंबातील अनेक महिलांना लाभ, आता तपासणी सुरू! ladaki bahin new update

ladaki bahin new update शासनाची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आता अशा लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना या योजनेतून वगळण्याची कारवाई सुरू केली आहे. ‘एफएसएसएम मल्टिपल इन फॅमिली’ या विशेष निकषाचा वापर करून प्रशासनाकडून ही तपासणी केली जात आहे.

अनेक अर्ज रद्द

जिल्ह्यात या योजनेसाठी तब्बल ४ लाख ७९ हजार २७० महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४ लाख ५२ हजार ८४४ महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, छाननीदरम्यान काही महिलांनी अपात्र असतानाही अर्ज केल्याचे उघड झाले. यामध्ये आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत अशा ९८ हजार ४२६ महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

कठोर पडताळणी मोहीम

योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलली आहेत. जिल्हा स्तरावर लाभार्थी यादीची कसून तपासणी सुरू आहे. आयकर विभागाकडील माहिती आणि लाभार्थींची माहिती यांची पडताळणी केली जात आहे. ज्या अर्जांमध्ये त्रुटी आढळत आहेत, त्यांना योजनेतून तात्काळ वगळले जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

राजकीय पार्श्वभूमी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एकाच घरातील दोन, तीन किंवा चार महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने आता या प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून, सखोल चौकशी सुरू केली आहे. या तपासणीतून आता किती अपात्र लाभार्थी बाहेर पडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a comment