लाडकी बहीण e-KYC खरंच सुरू झाली? ladki bahin e-KYC update

ladki bahin e-KYC update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही महिला अधिकृत संकेतस्थळावर प्रयत्न करत आहेत, तर काही गावातील महाई-सेवा आणि सेतू केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे.

नेमके काय सुरू आहे?

सोमवारपासून सोशल मीडियावर असे दावे केले जात होते की राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. या माहितीमुळे अनेक महिलांना भीती वाटू लागली की हप्ता अडकू शकतो. त्यामुळे त्या तातडीने सेतू केंद्रांकडे धाव घेत होत्या. पण तेथे जाऊन त्यांना निराशाच सहन करावी लागली.

सरकारचे अधिकृत स्पष्टीकरण

मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत शासन निर्णय (GR) किंवा अधिकृत घोषणाही जारी करण्यात आलेली नाही. सध्या योजनेसाठी कोणतीही नवीन नोंदणी प्रक्रिया किंवा ई-केवायसी सुरू नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नागपूर जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले की, नोंदणी किंवा ई-केवायसीबाबत शासनस्तरावरून कोणतीही अधिकृत सूचना आल्यास ती जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत अधिकृतरीत्या कळवली जाईल. तोपर्यंत महिलांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सेतू केंद्रांवर गर्दी करू नये.

सायबर फसवणुकीचा धोका टाळा

ई-केवायसीच्या नावाखाली काही बनावट लिंक्स सोशल मीडियावर फिरत आहेत. अशा लिंक्सवर क्लिक केल्यास वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते आणि बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. म्हणून महिलांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

  • मोबाईलवर ई-केवायसी किंवा नोंदणीसंदर्भात कोणतीही अनोळखी लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका.
  • लिंकवरील प्रक्रियेदरम्यान आलेला ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका.
  • जोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत कोणत्याही अनोळखी लिंकवर विश्वास ठेवू नका.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी अधिकृत अपडेटसाठी फक्त सरकारी संकेतस्थळ किंवा जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत सूचनांवरच लक्ष ठेवावे. अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करण्याऐवजी शांत राहा आणि अधिकृत माहितीची वाट पाहा.