मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेत नवी अडचण! website error

website error मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू होताच शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अर्ज भरताना Farmer ID टाकल्यानंतर जमिनीचा तपशील उपलब्ध होत नसल्याची समस्या अनेक शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे वेबसाइट सुरू असूनदेखील शेतकऱ्यांना अर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येत नाही.

अर्ज प्रक्रिया सुरू, पण अर्ज भरता येईना!

योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, Farmer ID द्वारे जमीन तपशील उपलब्ध होत नसल्याने अर्ज प्रक्रिया अडकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शासनाने तातडीने समस्या सोडवावी!

ही पोर्टलवरील तांत्रिक अडचण असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन समस्या दूर करणे आवश्यक आहे. वेबसाइट सुरू झाल्यानंतरही अर्ज करता येत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे.

तसेच, तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर सर्व पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.