मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार आपण आज या योजनेमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना 28 जून 2024 रोजी अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याच्या 2024- 2025 च्या अर्थसंकल्पात (Budget) मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ची घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. या योजनेचा लाभा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबाला आणि गरीब कुटुंबांना होणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य सरकारने राज्यातील 52 लाखाहून जास्त कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनीअर्थसंकल्पात महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर  करण्यासाठी ही योजना खूप फायद्याची ठरेल असं  म्हंटले. या योजनेअंतर्गत स्वयंपाक करण्यासाठी विशेषता ग्रामीण भागातील महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे. त्या महिला स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करीत असतात आणि त्या चुलीच्या धुरामुळे  घरातील लहान मुलांना महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या होणाऱ्या धुराच्या त्रासापासून त्यांची आता सुटका होणार आहे.

स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढवणं गरजेचं आहे असं अजित पवार म्हंटले.त्यासाठी राज्य सरकारकडून गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडायला हवा, म्हणून प्रत्येक पात्र कुटुंबाला या योजना अंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली ही घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

या योजनेअंतर्गत 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे . याची माहिती  28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात अजित पवार यांनी संगितली . या योजनेसाठी पात्रता कोण असेल, या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल, आवश्यक लागणारे कागदपत्रे या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचवा.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र

योजनेचे नाव

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासनाद्वारे

राज्य

  महाराष्ट्र

 या योजनेची घोषणा

 28 जून 2024

उद्देश

गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर वाढत्या किमती पासून दिलासा देणे .

लाभ

  दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील पाच सदस्य असलेले कुटुंब

अधिकृत संकेतस्थळ

उपलब्ध नाही

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र उद्देश

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कुटुंबांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना खूप मोठी मदत होणार आहे.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना प्रत्येकी वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना होणाऱ्या  धुरांच्या त्रासापासून सुटका होणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये

  •  या योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिले जातील.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख पेक्षा जास्त कुटुंबांना दिला जाणार आहे.
  •  या योजनेमागचा उद्देश असा आहे की गरीब आणि गरजू लोकांना अन्नसुरक्षा प्रदान करणे.
  •  या योजनेअंतर्गत पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांना लाभ दिला जाईल.
  •  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळण्यास जुलै किंवा ऑगस्ट पासून सुरुवात होईल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्रता

  • या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र मूळ रहिवासी असला पाहिजे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी घरात किमान पाच सदस्य असावेत.
  • लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःच्या नावाने राशन कार्ड असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल . 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र अटी व नियम

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
  • महाराष्ट्र राज्य बाहेरील व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेअंतर्गत वर्षातून तीनच गॅस सिलेंडर चा लाभ दिला जाईल त्यानंतर लाभार्थ्याला लागलेले सिलेंडर विकत घ्यावी लागतील.
  •  लाभार्थी व्यक्तीच्या घरात कितीही गॅस कनेक्शन असले तरी पण याचा लाभ एकाच सदस्याला दिला जाईल.
  •   पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाईल.
  •  पिवळे व केशरी राशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • पांढरे राशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र आवश्यक लागणारे कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  •  राशन कार्ड
  •  एलपीजी गॅस कनेक्शन
  • मतदार ओळखपत्र
  •  मोबाईल क्रमांक
  • बँक खाते नंबर
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल क्रमांक

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज करण्याची पद्धत

    महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही आताच सुरु केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल.
2024 मध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार जुलै महिन्यात या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत  सुरू करेल.
सरकारकडून या योजनेचा  अर्ज सुरू होताच, आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे लवकरात लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करू.

विचारले जाणारे प्रश्न

  1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र घोषणा कधी करण्यात आली?
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी केली .
  1. या योजनेची घोषणा कोणी केली?
  •  या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
  1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना चा लाभ राज्यातील किती कुटुंबाला दिला जाईल?
  •  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील 52 लाख 16 हजार 412 कुटुंबाला प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील .
  1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे अटी व नियम काय आहे?
  •  या योजनेअंतर्गत लाभार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असायला पाहिजे. महाराष्ट्र बाहेरील व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला प्रत्येकी वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. नंतर लागलेले सिलेंडर हे लाभार्थी व्यक्तींना विकत घ्यावी लागते.

3 thoughts on “मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना”

  1. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

    Reply
  2. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन या सिलेंडर मोफत

    Reply

Leave a comment