मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल.
महिलांसाठी आता आपल्या लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महिलांना जास्त धावपळ करण्याची काही गरज नाही मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला वेळ दिला आहे महिलांना योग्य पद्धतीने लाभ देणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही अगोदर घोषणा झाल्या होत्या त्यामुळे 1 जुलै पासून प्रत्येक ठिकाणी बायकांची गर्दी वाढलेली आहे महिलांना वाटत असेल की आपलं काम होईल का नाही कारण या योजनेसंदर्भात फक्त महिलांना पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता म्हणून महिलांच्या मनामध्ये थोडी दचपच वाढली होती. धडपड इकडे जातात तिकडे जातात 1 जुलै पासून महिलांची धडपड चालू आहे आपल्या या योजनेमध्ये लाभ मिळेल का पंधरा दिवसाचा कालावधी आहे. एक जुलै पासून 15 जुलै पर्यंत आपले डॉक्युमेंट जमा होतील का याची चिंता महिलांना होती कोणाचा आधार ला मोबाईल नंबर लिंक नाही तर कोणाचा आधार अपडेट नाही अशी परिस्थिती 1 जुलै पासून पाहायला मिळाली होती. तरीही आपल्या महिलांना वरील आदेशानुसार माहिती मिळतच होती की बदल होतील कालावधी भेटेल. शेवटी ते बदल झालेच सरकारलाही माहीत होतं की इतक्या लवकर एवढं सगळं होणं शक्य नाही खास करून महिलांसाठी ही योजना चांगल्या प्रकारे राबवण्याचे काम सरकार करत आहे.
जशी या योजनेची घोषणा झाली तसं अगदी सर्व महिलांचा मनामध्ये आनंदी आनंद दिसत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धडपड चालू आहे. तरी आमच्याकडून आपणास वारंवार सांगण्यात येत होते की यात बदल होणारच / करावेच लागणार आहेत.
लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल.
लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल.
- सदरील योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली होती या माहितीस्तव योजनेमध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदरील मुदत 2 महिन्याची ठेवण्यात येत आहे. म्हणजे महिलांना दोन महिन्यासाठी कालावधी /वेळ दिला जात आहे दि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 /- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
- या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाण प्रमाणपत्र असल्याचि माहिती मिळाली होती आता महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षे पूर्वीचे रेशनकार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, जन्म दाखला या पैकी 4 ही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यामध्ये येणार आहेत.
- सदरील योजनेतील योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
- सदरील योजनेमध्ये लाभार्थी महिलांचे वयोगट 21 ते 60 वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
- परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिला महाराष्ट्र अधिवास असलेल्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर याबाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
- रु.2.5 उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे.
- सदरील योजनेमध्ये कुटुंबांमधील एक अपात्र अविवाहित महिलेला (मुलींना) सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल. हे आहेत महत्वाचे बदल
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेतील नियम पाहूया
ज्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रु पेक्षा जास्त असेल च्या कुटुंबांमधील सदस्य आयकर दाता असेल परत ज्यांच्या कुटुंबांमधील लाभार्थी व्यक्ती कंत्राटी किंवा कायम कर्मचारी पदावर कार्यरत असेल, ट्रॅक्टर सोडून ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत. अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे नियम अगोदरच्या घोषणामध्ये करण्यात आले होते त्यामुळे यातील काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता
त्याचमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांकरिता योजना राबवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये दोन नियम बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र
- रेशनकार्ड
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- मूळनिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे – मतदान कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला / रेशन कार्ड / जन्म प्रमाणपत्र.
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
त्याचमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांकरिता योजना राबवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये दोन नियम बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया
- शहरांमधील लाभार्थी महिलांनी वॉर्ड ऑफिसर कडे नोंदणी अर्ज करावा.
- ग्रामीण भागातील महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे किंवा ग्रामसेवक कडे नोंदणी अर्ज करावा.
- 21 वर्षे पूर्ण झालेल्या व 65 वर्ष ज्यांना पूर्ण झाली नाहीत अशा लाभार्थी वयोगटातील महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करायचा आहे.
- या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून झाले असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहे. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे प्राधान्य देत हे काम पूर्णपणे करावे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्ज नमुना उपलब्ध करून दिला जाईल.
निष्कर्ष
केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आणि आर्थिक लाभाच्या योजनेमार्फत महिन्याला 1500 रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर या योजनेमार्फत फरकाची रक्कम पात्र महिलेस देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल. पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या डायरेक्ट लाभ हस्तांतरण सक्षम त्यांच्या चालू असलेल्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रक्कम देण्यात येत आहे. चला तर मग महिला भगिनींनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या नियमांचे पालन करू आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाने अर्ज भरू तर सर्व योजना मराठी माहिती तंत्रज्ञानाद्वारे खास करून वेगवेगळ्या योजनांची माहिती महिला पर्यंत पोहोचण्याचे काम आपले मराठी माहिती तंत्रज्ञान करत आहे.
लाडकी बहीण योजना महत्वाचे बदल.