E pik pahani last date ई पीक पाहणी करण्याची ही आहे अंतिम तारीख
E pik pahani last date ई पीक पाहणी करण्याची ही आहे अंतिम तारीख
महाराष्ट्राचे शासनाने शेतकऱ्यांसाठी आपल्या पिकाची ऑनलाईन पद्धतीने नोंद करण्यासाठी राज्यात E pik pahani last date ई पीक पाहणी हा प्रकल्प राबवण्यात हाती घेतला यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणीच्या ॲप मधून आपल्या सातबारे वर करणे आवश्यक आहे परंतु मागील वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी न केल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. यावर्षी तरी शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी न करण्याची चूक करू नये
आता हे नेमके झाले कसे तर ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर केली नाही अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कापूस सोयाबीन अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाणातला अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही. यामुळे शेतकऱ्यांना पात्र असताना देखील अनुदान मिळालेले नाही त्यामुळे ई पीक पाहणी अत्यंत महत्त्वाचे झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपली ई पीक पाहणी केली नाही. त्यांनी 15 सप्टेंबर या अंतिम तारखेच्या आधी आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी
ई पीक पाहणी कशी करावी
ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करायचे आहे त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि या ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या पिकाची सातबारावर नोंद होऊ शकतात.
E pik pahani last date ई पीक पाहणी करण्याची अंतिम तारीख
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुदत देण्यात आलेली आहे आता ही मुदत सप्टेंबर मधील 15 तारखेपर्यंत देण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आपली ई पीक पाहणी केली नाही. त्यांनी लवकरात लवकर अंतिम कालावधीच्या आत आपली ई पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात निर्माण आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे विलंब न करता आत्ताच ई पीक पाहणी करून घ्यावी.
1 thought on “E pik pahani last date : ई पीक पाहणी करण्याची ही आहे अंतिम तारीख.”