रब्बी हंगाम रासायनिक खत अनुदान वाटपासाठी मंजुरी.
FERTILIZER SUBSIDY शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध पीक अन्नद्रव्यांचा वापर करावा लागतो या पिकांना द्रव्य म्हणजेच रासायनिक खत यावर सरकारकडून अनुदान दिले जाते जेणेकरून या रासायनिक खताच्या किमती शेतकऱ्यांना परवडेल अशा स्थितीत राहतात यासाठी केंद्र सरकारकडून 2024 25 मध्ये रब्बी हंगामासाठी रासायनिक खतावरील अनुदान देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एका रब्बी हंगामा रासायनिक खतावर अनुदान मिळणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामध्ये रब्बी हंगाम 2024 साठी ऑक्टोबर 2024 ते मार्च 2024 पर्यंत खतावरील अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांना मिळणार आधार कार्ड प्रमाणे नवीन कार्ड
FERTILIZER SUBSIDY अनुदान वितरीत करण्यास मान्यता
रब्बी हंगाम 2024 साठी शासनाकडून सुमारे 24 हजार 475.53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीच्या तसेच परवडणाऱ्या दरामध्ये रासायनिक खत उपलब्ध केली जातील या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या पिकांना आवश्यक असणारे अन्नद्रव्य वेळेवर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होते हाच विचार करून शासनाने शेतकऱ्यांसाठी पुढील हंगामात रासायनिक खतावरील अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कोणत्या खतावर मिळणार अनुदान.
FERTILIZER SUBSIDY सरकार विविध खत उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीच्या दारात खत देण्यासाठी प्रयत्न करत असतो यामध्ये सरकारकडून एकूण 28 प्रकारच्या खतावर अनुदान वितरित केलं जातं यामध्ये प्रामुख्याने युरिया डीएपी एमओपी आणि सल्फर या खतांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Npk शेतकऱ्यांना परवडेल अश्या दरात खत उपलब्ध
रासायनिक खतांची आंतरराष्ट्रीय दर्जा किमतीचा तुलना केल्यास ही किंमत भारतीय शेतकऱ्यांना सध्या स्थितीमध्ये तरी परवडणारी नाही. यामुळे केंद्र सरकारकडून 2010 पासून या रासायनिक खतावर अनुदान (FERTILIZER SUBSIDY) वितरित केले जातात. यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या घटकांना मुख्यतः मोठ्या प्रमाणावर अनुदान वितरित केलं जातं हे अनुदान वितरित केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यात मदत मिळते, परंतु जरी अनुदान दिले नाही तर शेतकऱ्यांना या मूलभूत अन्नद्रव्याची म्हणजेच रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर किंमत मोजावी लागेल. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन खर्चामध्ये खूप मोठी वाढ होईल व शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतील त्यामुळे या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात या खतांच्या किमती ठेवण्यात येतात.
1 thought on “FERTILIZER SUBSIDY रासायनिक खतांना अनुदान वाटपास मंजूरी”