Aadhar Update : आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे ओळखपत्र आहे, ज्यामध्ये व्यक्तीची बारा अंकी युनिक ओळख, नाव, फोटो, पत्ता, बायोमेट्रिक माहिती याचा समावेश असतो. जर तुमचा पत्ता बदलला असेल किंवा आधार वरील माहिती किती असेल तर, ती व्यवस्थित करणे आवश्यक आहे.Aadhar Update

Aadhar Update बदलण्याची प्रक्रिया
UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) नागरिकांना पत्ता अपडेट करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा उपलब्ध करून देते. बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी आधार (Aadhar Update) केंद्राला भेट द्यावी लागते, पण पत्ता घरबसल्या ऑनलाइन बदलता येतो. ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.
हे वाचा : सरकार राज्यात राबवणार जिवंत सातबारा मोहीम.
पत्ता अपडेटसाठी लागणारी कागदपत्रे
- पासपोर्ट
- बँक स्टेटमेंट किंवा पासबुक
- रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- मनरेगा किंवा नरेगा जॉब कार्ड
- वीज, पाणी, गॅस, टेलिफोन किंवा पोस्टपेड मोबाईल बिल
- विमा पॉलिसी किंवा मालमत्ता कर पावती
घरबसल्या पत्ता Aadhar Update अपडेट करण्याची प्रक्रिया.
- घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम my Aadhaar या पोर्टलला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, कॅपचा कोड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर ॲड्रेस अपडेट या पर्यायावर क्लिक करा Aadhar online update निवडून घ्या.
- त्यानंतर तेथे दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करा आणि Proceed या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन पत्ता टाकून घ्या आणि update Aadhar या पर्यायावर क्लिक करा.
- पत्ता अपडेट करताना ऑनलाईन फॉर्म मध्ये तुमचा नवीन पत्ता भरावा लागतो.
- आवश्यक असल्यास, तुम्ही Care Of ( C/O) च्या माध्यमातून वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव जोडता येते.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचे पोस्ट ऑफिस निवडा. आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरलेली सर्व माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तपासून घ्या.
- आणि त्यानंतर 50 रुपये शुल्क ऑनलाईन भरा.
- तुमचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला SRN (service Request Numbr) मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासून शकतात.
पत्ता बदलण्यास लागणारा कालावधी
UIDAI नुसार, पत्ता अपडेट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः 30 दिवस लागू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला URN (Update Request Number) मिळेल, ज्याद्वारे तुम्ही अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.
नवीन आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
पत्ता अपडेट झाल्यानंतर तुम्ही UIDAI तुमचा नवीन आधार कार्ड डाउनलोड करून शकतात. मात्र आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे. योग्य माहिती आणि आवश्यक कागदपत्रे असल्यास, काही मिनिटांत तुमचा पत्ता अपडेट होऊ शकतो आणि तुमच्या आधार कार्डाची अचूकता कायम राहते! Aadhar Update