Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अडीच कोटीहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र,आता शासनाने लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका येऊन चार चाकी गाडी आहे का?हे तपासणार आहे. ज्या घरी तपासणी करत असताना चार चाकी गाडी आढळून आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जाणार नाही .
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली होती .त्यावेळी अर्ज करत असताना निकषासंदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आली होते . या योजनेत कुटुंबातील चार चाकी वाहन नसलेल्या योजनेसाठी पात्र होत्या . मात्र त्यावेळेस अर्जाचे पडताळणी न करताच सर्व महिलांना लाभ देण्यात आला . सरकारने नंतर कार असलेल्या किंवा निकषातत न बसलेल्या महिलांना स्वतःहून लाभ सोडावा,असे आवाहन केले होते. मात्र सरकारने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद कमी मिळाल्याने आता अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे . यात ज्या महिला निकषात बसत नाही अशा महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे .Ladki Bahin Yojana

लवकरच जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन तपासणी सुरू
मुख्यमंत्री माझी (Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी आहे की नाही हे तपासण्यासाठी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे . त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आरटीओ कडून अंगणवाडी सेविकांना सव्वातीन हजार लाडक्या बहिणींची यादी देण्यात आली आहे .जर कुटुंबातील एका व्यक्तीकडे कर असेल तर त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे .Ladki Bahin Yojana
हे वाचा : खरीप पिक विमा बाबत दिली महत्त्वाची माहिती.
स्वतंत्र राहणाऱ्या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ
जर तुमच्या कुटुंबातील सासरे,दीर किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असेल आणि लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत विभक्त राहत असल्यास, त्या महिलांना या योजनेचा लाभ सुरूच ठेवण्यात येणार आहे असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे .
सव्वा तीन हजार अर्जाची तपासणी होणार
महिला बालकल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यापैकी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी कार आहे का, तपासणीला लवकर सुरुवात होणार आहे . वरिष्ठाकडून आदेश देण्यात आलेले आहेत .आरटीओ कडून मिळालेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना पोहोच करण्यात आले आहे . विभागाकडून असे सांगण्यात येत आहे की,सव्वातीन हजार लाभारती महिलांची तपासणी केली जाणार आहे. Ladki Bahin Yojana
अंगणवाडी सेविका व आरटीओ कडे यादी
परिवहन विभागाकडून राज्यातील चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असणाऱ्यांची यादी महिला व बालकल्याण विभागाने घेतली आहे . या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन चार चाकी वाहन कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करणार आहे व यादीतील नाव आणि व्यक्तीची नावे याचा तपास करणार आहे . कार चालविण्याचा परवाना आहे . मात्र,दुसऱ्याची कार चालवणाऱ्यांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार नाही.
चार चाकी वाहन नावावर असणाऱ्यांची नावे वगळणार
सरकारने या योजनेचा लाभ देतानाच महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते . यात चार चाकी कार नाही असे नमूद केल्याने त्यांना लाभ देण्यात आला होता .मात्र ज्यांच्या नावावर कार आहे, अशा लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले होते .मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता महिलांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे व नावे कमी केले जाणार आहेत .
लाडकी बहीण योजनेचे काही निकष
लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशा महिला,ज्या महिलांच्या कुटुंबात आयकर भरतो अशा महिला ,शासकीय नोकरी, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत . मात्र,आता पडताळणी करताना निकषाची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थी महिला या योजनेतून वागळल्या जाणार आहेत .Ladki Bahin Yojana