pik vima 2024 kharif खरीप पिक विमा बाबत दिली महत्त्वाची माहिती.

pik vima 2024 kharif शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या पिकाचे संरक्षण देण्यासाठी सरकारने देशांमध्ये पंतप्रधान पिक विमा योजना राबवण्यास सुरुवात केली या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई वितरित केली जाते.

मागील हंगामातील म्हणजेच खरीप 2024 मधील पिक विमा वाटप करण्याबाबत कंपन्यांनी शासनाकडील रक्कम न मिळाल्याचे कारण दाखवले होते यावर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विमा कंपन्यांची माहिती घेत विमा कंपन्यांना उर्वरित रक्कम वितरित करणार असल्याची माहिती दिली.

pik vima 2024 kharif

राज्य सरकारकडून खरीप 2024 ची नुकसान भरपाई देण्यासाठी 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. राज्य सरकार हिस्सा कंपनीला उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल यामुळे पिक विमा वाटप लवकरात लवकर म्हणजे 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल अशी देखील माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात बोलताना दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

काय म्हणाले कृषिमंत्री pik vima 2024 kharif

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात बोलताना राज्यातील शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी पीक विम्याचे वाटप केलं जाईल अशी माहिती दिली. सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधवेशन सुरू आहे. त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल. परंतु येत्या 31 मार्चपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन देखील यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे.

विमा मिळण्यास का होतो उशीर

खरीप हंगामातील पिक विमा अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.या होणाऱ्या दिरंगाई मध्ये कोणाची चूक आहे किंवा पिक विमा कंपन्या जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत का असा प्रश्न देखील निर्माण निर्माण झाला आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

राज्यातील खरीप हंगामा 2024 मध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पुराच्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला होता. या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या तक्रारी कंपनीला दिले आहेत. त्या भागात कंपन्याकडून पंचनामे करण्यात आले. pik vima 2024 kharif

पीक नुकसान पंचनाम्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे मंजूर करण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. pik vima 2024 kharif

ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये आपल्या पिकाची नुकसान झालेली तक्रार सादर केली होती अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे रक्कम वितरित केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्याने खरीप हंगाम 2024 मध्ये कंपनीकडे तक्रार केली नव्हती अशा शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे.

पिक विमा कंपनी कंपनीकडून तक्रार सादर केलेले शेतकऱ्याचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे नुकसान आढळून आले अशा शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. या शेतकऱ्यांची यादी देखील कंपनीकडे तयार असून शासनाकडून रक्कम मिळाल्या नंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. अशी माहिती पीक विमा कंपन्याकडून देण्यात आलेली आहे.

pik vima 2024 kharif

Leave a comment