Aajache Bajarabhav : देशातील कृषी बाजारात हळद या पिकाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर नव्या हळदीची आवक बाजारात वाढत असताना त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. यावर्षी देशभरात हळद पिकाची लागवड वाढली असून, पिकावर कीड व रोगाचा परिणाम झाला असला तरी पण यंदा हळदीचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात नवी हळद येण्यास सुरुवात होताच दर 2,000 ते 3,000 रुपये कमी झाले आहेत. सध्या हळदीचे दर हे 11,000 ते 12,000 रुपयापर्यंत स्थिर राहिले आहेत.पुढील काळात किरकोळ चढ-उतार संभवतात, मात्र मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे . Aajache Bajarabhav

केळी दर
केळीच्या भावात मागच्या काही दिवसापासून चांगली सुधारणा झाली आहे. कुंभ मेळ्यामुळे केलेला चांगला उठावा मिळाल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या पिलबाग केळीची आवकही कमी असून, त्याचे दर 1800 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. केळीच्या भावात आणखीन सुधारणा होण्याची शक्यता आहे, कारण पुढच्या महिन्यापर्यंत केळीची आवक वाढू शकते.
हे वाचा : Mahadbt Lottery Update: तुम्हाला आला का मेसेज, जाणून घ्या.
कांदा दर
सध्या कांद्याच्या बाजारभावामध्ये चढ-उतार सुरूच आहे. बाजारामध्ये कांद्याची आवक वाढली आहे तरी कांद्याचा भाव (Aajache Bajarabhav) 1700 ते 2,200 रुपये दरम्यान स्थिर आहे. कांद्याच्या अवकावर दबाव नाही, त्यामुळे चांगला उठावा मिळत असल्याने भाव काही काळ स्थिर राहू शकतात. उन्हाळी कांदा बाजारात येण्याअगोदर कांद्याच्या भावात थोडेफार बदल होऊ शकतात.
सोयाबीन दर
सध्या सोयाबीनच्या बाजारात दरामध्ये चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे कमी झाले असून, देशातही सोयाबीनच्या भावात दबाव कायम आहे. सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे (Aajache Bajarabhav) भाव 3,900 ते 4,100 रुपयाच्या दरम्यान आहेत. सध्या असा अंदाज व्यक्त केला जात आहे की काही आठवड्या पर्यंत सोयाबीनचे भाव कमीच राहतील.
कापूस दर
सध्या कापसाच्या बाजारात चढ-उतार सुरूच आहे. कापसाचे दर सध्या 7,000 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे 65.63 सेंट प्रति पाऊंडवर बंद झाले आहेत. फेब्रुवारी पर्यंत कापसाची आवक आणखीन कमी होण्याची शक्यता आहे, असे बाजारातील विश्लेषक सांगतात.Aajache Bajarabhav
1 thought on “Aajache Bajarabhav :कांदा, हळद ,केळी आणि कापूस ,सोयाबीन, जाणून घ्या आजचे बाजार भाव”