Aajit navle : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा पत्ता नाही,परंतु शेतकऱ्यांची एक रुपया पिक विमा असणारी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विविध योजनांना कात्री लागत आहे, तरीपण विविध योजना देण्याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक(फार्मर आयडी) 15 एप्रिल पासून अनिवार्य करण्यात आले आहे .पण या योजनेच्या नावाखाली कॉर्पोरेटकंपन्यांना शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध करून देण्याचा डाव असल्याचा संशय शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे .Aajit navle

शेतकऱ्याच्या पिकांची नुकसान
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके आडवी झाली आहे.या शेतकऱ्यांना सध्या आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे परंतु राज्य सरकारच्या तिजोरीव आर्थिक ताण आहे,पण तरी सरकार विविध योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाली राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची सर्व माहिती तसेच जिओ रेफरल लँड पर्सनल याची सर्व माहिती एकत्रित करण्यात येत आहे . राज्यातील शेतकऱ्यांची व शेतीची माहिती घेऊन शेतकऱ्यांचा आधार नंबर हा त्या माहितीशी जोडून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी देण्यात येत आहे .शेतकऱ्यांचा ओळख क्रमांक आणि त्याच्याशी सलग्रीत असणारी माहिती आणि त्यावरील घेतलेली पिके याची सर्व माहिती ॲग्री स्टॉक या योजनेची जोडण्यात येणार आहे .Aajit navle
हे वाचा : घरकुल योजना 2025 नवीन नाव नोंदणी सुरू. अशी करा नोंदणी.
किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी या योजनेवर संशय
किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Aajit navle) यांनी या योजनेवर संशय व्यक्त केला आहे .ते म्हणाले फार्मर आयडी च्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेतीतील माहिती आणि पिकांची माहिती तसेच शेतकऱ्यांच्या मालमत्तेची सर्व आकडेवारी कॉपोर्रेट कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात येत असून शेती क्षेत्रावर कब्जा करण्याचा मोठा डाव आहे .सर्व शेती योजनाची माहिती एकत्र करून आणि सरळ रोख रक्कम शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे हे फक्त म्हणणे आहे,पण या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॉर्पोरट कंपन्यांना शेती क्षेत्र एक्ससेबल करणे हा मुख्य उद्देश आहे .ते म्हणाले नव्या परतंत्र्याची ही नांदी आहे ,अशा भाषेमध्ये बोलत या योजनेवर अजित नवले यांनी हल्लाबोल केला Aajit navle