abhay yojana पश्चिम महाराष्ट्रातील 9 हजार नागरिकांचा अभय योजनेत सहभाग

abhay yojana पश्चिम महाराष्ट्रातील 9 हजार नागरिकांचा अभय योजनेत सहभाग विजबिल थकबाकीचा प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण व्याज विलंब आकार शुल्काची माफी असलेला महावितरण अभय योजनेला चांगली साथ मिळत आहे. अभय योजनेत पश्चिम महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत 9 हजार 698 नागरिकांनी सहभाग नोंदविलेला आहे, अशी माहिती महावितरण विभागाच्या सूत्रांनी दिलेले आहेत.

abhay yojana महाराष्ट्रातील 9 हजार नागरिकांचा सहभाग

abhay yojana थकबाकी असलेल्या जागेवर सध्या विजेची गरज नसली, तरी पण अवय योजनेचा फायदा घेत विज बिलाच्या थकबाकी मुक्तीला प्राधान्य देत 4 हजार 114 नागरिकांनी नवीन विज जोडण्याची मागणी नसल्याचे अर्जात नमूद केले आहे, तर उर्वरित 5 आजार 583 नागरिकांनी मात्र नवीन विविध जोडणे घेणार आहोत असे स्पष्ट केले आहे. कृषी आणि सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक , औद्योगिक आणि इतर विज ग्राहकांसाठी अभय योजना लागू आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : 10 टक्के रक्कम भरा आणि मिळवा सौर ऊर्जा

महत्त्वाचं म्हणजे फक्त मूळ थकबाकीच्या रकमेचा एक रकमी भरना केल्यास लघुदाब नागरिकांना अजून 10 टक्के, तर उच्च दाब नागरिकांना 5 टक्के सवलत मिळत आहे किंवा मूळ थकबाकीची सुरुवातीला 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम ही त्या नागरिकांना व्याज मुक्त 6 हप्त्यात भरण्याची देखील संधी आहे.


तसेच मागणीनुसार नवीन वीज जोडणी घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना अर्ज करायचा आहे अशा नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करावे थकबाकी मुक्तीच्या या योजनेचे फक्त 57 दिवस बाकी आहेत. अभय योजनेसाठी एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकता. या योजनेत पुणे 4617, सातारा 455, सोलापूर 1439, कोल्हापूर 1102, सांगली जिल्ह्यातील 285 थकबाकीदारानी सहभागी होऊन लाभ घेतलेला आहे.

Leave a comment