Agricultural Mechanization : राज्य सरकारने 2024 25 च्या कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 75 हजार कोटी रुपयाचा निधी कृषी विभागाला वर्ग करण्यात आला आहे .या योजनेचा प्रलंबित निधी आणि लॉटरीसाठी कृषी आयुक्तालयाला निधी वितरित करण्यात आला आहे .त्यामुळे आता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते .त्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे .लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी थेट जमा करण्याचे निर्देशही शासन निर्णय देण्यात आले आहेत . Agricultural Mechan

कोणत्या शेतकऱ्यांना होणार लाभ?
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे यामध्ये अनुसूचित जाती/जमाती,महिला,अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे .तसेच या योजनेअंतर्गत इतर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 40 टक्के किंवा 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल ती रक्कम देण्यात येणार आहे .त्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे .
हे वाचा : प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज
राज्य सरकारने निधी वितरित
राज्य सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध यंत्रासाठी अनुदान दिले जाते. परंतु 2024 – 25 च्यायोजनेचं अनुदान पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रलंबित होते .त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती . आता मात्र आर्थिक वर्ष संपत असताना राज्य सरकारने पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरित केला आहे . Agricultural Mechanization
75 कोटीचा निधी वितरित करण्यास मंजुरी
2024- 25 च्या अर्थसंकल्पात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी राज्य सरकारने 250 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती .त्यातील 150 कोटीच्या निधी या अगोदरच जुलै 2024 मध्ये मान्यता देण्यात आली होती .
27 कोटी रुपयांचा निधी सप्टेंबर 2024 मध्ये मंजूर करण्यात आला होता .त्यातील उर्वरित आता 75 कोटीचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत हा निधी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत . Agricultural Mechanization