Agriculture News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमावेळी उपस्थित असताना मोठी घोषणा केली आहे. कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. तर तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही असेही माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच ,कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे. हा लॅपटॉप देणे मागचा उद्देश म्हणजे उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी, हुशार आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील, असा प्रयत्न आहे.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्य शाळेच्या उद्घटनाप्रसंगी उपस्थित होते.Agriculture News

कृषी हॅकेथॉन आयोजित करण्यात येणार
त्यावेळेस ते बोलत असताना म्हणाले , कृषी हॅकेथॉन आयोजित करून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे . तसेच याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा येणार आहे . फक्त कृषी विद्यापीठावर अवलंबून न राहता शेतीमध्ये,उत्पादनामध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी तसेच तंत्रज्ञान विकसित केलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून नवीन प्रकल्प घेणे,तंत्रज्ञान लोकभिमुख करणे असा या मागचा उद्देश आहे .Agriculture News
हे वाचा : शेतकरी ओळखपत्र काढले का ? तरच मिळेल शासकीय योजनांचा लाभ.
राज्यातील अनेक शेतकरी सुशिक्षित नाहीत परंतु ते प्रयोगशील आहेत तसेच त्यांना तंत्रज्ञानाची ओढ आहे . नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता असल्यामुळे हे शेतकरी शेतामध्ये बदल करणार आहेत .आता राज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते सारखे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे .हे तंत्रज्ञान अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष राबवण्या सुरू केले आहे .पण या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची काम शासनाला करायचे आहे, असे एका कार्यक्रमांमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणले .
बदल घडविण्याचे आव्हान
राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी सुरज मांढरे उपस्थित होते. त्यावेळेस बोलत असताना ते म्हणाले, या कार्यशाळेत शेतकऱ्यातील शेतकरी तसेच विक्रेता ,खरेदीदार आदी पैलुंवर चर्चा करण्यासह कृषी विभाग , शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नावर विचार मंथन करतील आणि उपाययोजना सादर करून एक नवीन दिशा ठरवण्यात येणार आहे .आज देशाच्या कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली आहे ,मात्र ग्राहक अण्णाच्या गुणवत्तेबाबत संभ्रमित आहे .व्यक्तिगत शेतकऱ्यांची खरेदी क्षमता विखुरल्यामुळे खर्चामध्ये वाढ झाली आहे . आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या वेगाने पुढे येत आहे .आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे,असे सुरज मांढरे म्हणाले . Agriculture News