AI in Farming : राज्यामध्ये सर्व पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI in Farming) वापर करण्यात येणार आहे. देशामध्ये असा प्रयोग करणारे राज्य हे पहिलेच महाराष्ट्र राज्य ठरणार आहे .अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या कृषी क्षेत्रात प्रयोगी तत्त्वावर एआय च्या वापरासाठी 560 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे .ऊस उत्पादन शेतीवर प्रयोगिक यायचा वापर राज्यात सध्या केला जात आहे .त्याचे फायदे सुमुराजे आहेत .राज्यातील हवामान,तापमान,माती आणि पीक वैविधता लक्षात घेऊन इतर पिकांसाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे .AI in Farming

खरीप हंगामापासून एआय चा वापर
कृषी क्षेत्र संबंधित सल्ला देण्यासाठी केंद्र सरकारच्या विस्तार या संकेतस्थळाचा यासाठी वापर करण्यात येणार आहे . केंद्र सरकारच्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती उत्पादनातील वाढ आणि विविध बाबींची माहिती विश्लेषण करून या संकेतस्थळाच्या माध्यमातून दिली जाणार आहे .विस्तार या संकेतस्थळाचा वापर करून राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI )वापर करण्यात येणार आहे .AI in Farming
हे वाचा : ॲग्री स्टॅक योजना शेतीचे होणार डिजिटलीकरण शेतकऱ्यांना मिळणार युनिक आयडी कार्ड अशी करा नोंदणी.
विस्तार पोर्टलच्या माध्यमातून ही प्रणाली राबवली जाणार.
विस्तार या संकेतस्थळाचा वापर करून राज्यांमध्ये खरीप हंगामापासून ही प्रणाली राबवली जाणार आहे. या प्रणालीचा वापर करून वापर करून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया,कृषी विद्यापीठाची संशोधने,शेतकऱ्यांचे प्रयोग,हवामान, किडा नियंत्रण,मातीचा पोत, वाफसा ,जमीन सुधारणा, पाणी,खते, पावसाचा अंदाज,कीटकनाशकांची गरज , पीक स्थिती याबरोबरच बाजारपेठ,शेतीमाल साठवणुकीसाठी वखार महामंडळाचे गोदामे ,बाजार समितीमधील दर इत्यादी माहिती शेतकऱ्यांना दिले जाणार आहे . या सर्व माहितीचा वापर करून शेतीमध्ये सुधारणा होणार आहे . शेतकऱ्यांसाठी ही माहिती सहायभूत ठरेल .AI in Farming
शेतकऱ्यांना सल्ला कसा मिळेल
शेतकऱ्यांना IVRS म्हणजेच शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवरून कॉल केल्यास विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून उत्तरे दिली जातील. स्मार्टफोनवरून शेतीसंबंधी सर्व माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच,सरकारकडून एक ॲप विकसित केले जाणार आहे .त्यात मध्ये ही सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल .शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी जीपीओ म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट राज्य सरकार स्थापन करणार आहे .तसेच याबरोबरच ॲग्री स्टॉप योजनेअंतर्गत जी माहिती संकलित केली जाणार आहे,त्याचाही वापर केला जाणार आहे. ॲग्री स्टॉक , ई- पाहिणी अनिल जीपीओतून येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्याचाही वापर सल्ल्यासाठी करण्यात येणार आहे .AI in Farming
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
राज्यामध्ये अत्यल्प शेतकरी खातेदारांची संख्या 93 लाख 43 हजार आहे तर अल्पभूधारक शेतकरी खातेदारांची संख्या 51 लाख 17 हजार आहे .ही संख्या नम्र,मध्यम आणि मोठ्या शेतकरी खातेदारांच्या तुलनेमध्ये मोठी आहे .या शेतकऱ्यांसाठी .इतर योजना राबवणे खूप अवघड आहे .त्यामुळे विस्तार संकेतस्थळाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी एआय तंत्रज्ञान खूप फायद्याचे ठरू शकते .विदर्भ, उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, या भागामध्ये पीक पद्धती,पर्जन्यमान,माती,मनुष्यबळ आणि उत्पादन मोठी विविधता आहे .
कृषी विभागाने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन ही योजना राबवण्याची ठरविले आहे . कृषी विद्यापीठामध्ये संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जात नाही .जसे की, बियाण्याचे चांगले वाण शेतकऱ्यांना माहीत नसते . तसेच अतिवृष्टी, अवर्षण इत्यादी माहिती मिळत नाही त्यामुळे त्याचा शेती उत्पादकतेवर मोठा परिणाम होतो .त्यामुळे शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी विविध संस्थांकडून संकलित केलेली माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली जाणार आहे .AI in Farming